शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हिवतापाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:39 IST

घाण पाण्यावरील, घोंगावणाऱ्या डासांच्या अ‍ॅनॉफिलिस जातीच्या मादीच्या दंशातून हिवताप पसरतो. त्यामुळे परिसरातील सर्व नाल्या वाहत्या करणे आवश्यक असून साचलेली डबकी, खड्ड्यांत पाणी साचू दिले नाही तर, हिवताप, डेंगू, चिकुनगुनिया, हत्तीरोग या रोगांना प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यामुळे याबाबत सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : घाण पाण्यावरील, घोंगावणाऱ्या डासांच्या अ‍ॅनॉफिलिस जातीच्या मादीच्या दंशातून हिवताप पसरतो. त्यामुळे परिसरातील सर्व नाल्या वाहत्या करणे आवश्यक असून साचलेली डबकी, खड्ड्यांत पाणी साचू दिले नाही तर, हिवताप, डेंगू, चिकुनगुनिया, हत्तीरोग या रोगांना प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यामुळे याबाबत सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.दरवर्षी आरोग्य विभागातर्फे जागतिक हिवताप दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने २५ एप्रिल रोजी हिंगोली शहरात जनजागृती मोहीम व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हिवतापाच्या धोक्यामुळे दरवर्षी अनेकांचा मृत्यू होतो. प्रत्येक गावात व शहरात हिवतापाचा कमी-अधिक धोका असतोच त्यामुळे हा आजार प्रत्येकांनी जाणून घेणे-समजून घेणे, योग्य ती खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रौढांपेक्षा मुलांमध्ये हिवतापाचे व मृत्युचे प्रमाणही जास्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हिवताप अधिकारी जी. के. चव्हाण यांनी केले.हिवतापाचा प्रसार अ‍ॅनॉफिलीस डासाच्या मादीपासून होतो. या डासांची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. भातशेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या , कालवे इत्यादीमध्ये. हिवताप प्रसारक अ‍ॅनॉफिलीस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात . तेथे वाढ होऊन डासांच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतू यकृतामध्ये जातात व तेथे त्याची वाढ होऊन १० ते १२ दिवसांनी मनुष्याला हिवतापाची लक्षणे - थंडी वाजून ताप येणे होय. ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो. नंतर घाम येऊन अंग गार पडते, डोके दुखते व बºयाचवेळा उलट्याही होतात. हिवतापाच्या निश्चित निदानासाठी तापाच्या रुग्णाचा रक्तनमुना घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो. हिवताप उपचार सुधारित उपचार पध्दती रक्त नमुना संशयित हिवताप रुग्णाचा रक्तनमुना घेऊन हिवताप रुग्ण दूषित आल्यावर त्यांना वयोगटानुसार क्लोरोक्वीन गोळ्यांची पूर्ण मात्रा दिली जाते. सूक्ष्मदर्शकाद्वारे रक्तनमुने तपासणीअंती हिवतापाचे निश्चित निदान झाल्यावर संबंधित रुग्णास जंतूच्या प्रकारानुसार योग्य ते औषधोपचार करण्यात येतात. कीटकजन्य रोगांना प्रतिबंध - हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया हे सर्व रोग स्वच्छ पाण्यात डास अंडी घालून त्यापासून डास अळी व नंतर डास तयार होतात याला प्रतिबंध करण्यासाठी घरातील सर्व पाणीसाठे आठवड्यातून एक दिवस धुवून पुसून कोरडे करणे आवश्यक आहे. घाण पाण्यात क्युलेक्स डासाची मादी अंडी घालते व त्यापासून हत्तीरोगाची लागण होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स