शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर खड्डे; वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST

‘तोफखाना येथील नाल्यांवर औषध टाका’ हिंगोली : शहरातील तोफखाना भागातील नाल्या साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले ...

‘तोफखाना येथील नाल्यांवर औषध टाका’

हिंगोली : शहरातील तोफखाना भागातील नाल्या साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नगर परिषदेने याची दखल घेऊन नाल्यांवर औषध फवारणी करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

वाडी-तांड्यावर पाणीटंचाई

शिरडशहापूर: औंढा तालुक्यातील शिरडशहापूर परिसरातील वाडी-तांड्यांवर मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांंना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संबंधित विभागाने वेळीच वाडी-तांड्यावर पाण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.

हळद काढणीला सुरुवात

हिंगोली: तालुक्यातील सवड, केसापूर, देऊळगाव, वरुड आदी गावामध्ये मागील तीन-चार दिवसांपासून हळद काढणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी हळद पिकावर रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने म्हणावा तेवढा उतारा आला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकंदर दरवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

वनविभागाचे दुुर्लक्ष

डिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे व परिसरात मागील पंधरा दिवसांपासून वानरांनी उच्छाद मांडला आहे. वेळोवेळी वनविभागाला सांगूनही अद्यापही कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. भाजीपाला तसेच इतर रबी पिकांची नासाडी वानरे करीत आहेत. वनविभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त

हिंगोली: येथील सामान्य रुग्णालयाच्या मुख्य गेटवरच खड्डे पडल्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना त्रास होत आहे. जिल्हा रुग्णालयाने याची दखल घेऊन मुख्य गेटवरील खड्डे बुजविणे गरजेचे झाले आहे.

‘मोक्याच्या जागी कचराकुंडी बसवा’

कळमनुरी: शहरातील मुख्य बाजरपेठेत कचराकुंडी नसल्यामुळे कचरा रस्त्याच्या कडेला साठविला जात आहे. परंतु, वाऱ्यामुळे हा साठवून ठेवलेला कचरा दुकानामध्ये जात आहे. नगर परिषदेने याची दखल घेऊन मोकळ्या जागी कचराकुंडी उभारावी, अशी मागणी नागरिक तसेच दुकानदारांनी नगर परिषदेकडे केली आहे.