गावठी, देशी दारू विक्रेत्यासह वाळू चोरट्यांवर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:32 AM2021-05-06T04:32:05+5:302021-05-06T04:32:05+5:30

हिंगोली : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळमनुरी व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत ठिकठिकाणच्या गावठी, देशी दारू विक्रेत्यांसह ...

Police raid on sand thieves, including village liquor dealers | गावठी, देशी दारू विक्रेत्यासह वाळू चोरट्यांवर पोलिसांचा छापा

गावठी, देशी दारू विक्रेत्यासह वाळू चोरट्यांवर पोलिसांचा छापा

Next

हिंगोली : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळमनुरी व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत ठिकठिकाणच्या गावठी, देशी दारू विक्रेत्यांसह वाळू चोरट्यांवर छापा मारून २३ लाख ३० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ४ व ५ मे राेजी करण्यात आली.

संचारबंदी काळात अवैध दारू विक्रीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी अवैध दारू विक्रेते तसेच वाळू माफियांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे पथक कामाला लावले होते. या पथकाने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या सिद्धार्थ नगरात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारला. या वेळी लक्ष्मण कमल्या चव्हाण (रा. खरबी) याच्या ताब्यातून १ हजार ६०० रुपयांची ८ लीटर गावठी दारू जप्त केली. त्यानंतर माळहिवरा येथे शरद साहेबराव पवार (रा. माळहिवरा) याच्या ताब्यातून ४ हजार ५०० रुपये किमतीची १० लीटर गावठी हातभट्टीची दारू व ५० लीटर सडके रसायन जप्त केले. तसेच कळमनुरी येथे अफरोज शेरखॉन पठाण याच्या ताब्यातून ४ हजार रुपये किमतीची २० लीटर हातभट्टी दारू जप्त केली. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मौर्या हॉटेल येथे छापा मारला असता ज्ञानेश्वर व्यंकटराव चव्हाण (रा. कांचन नगर, हिंगोली) यांच्याकडे ११ हजार ८०० रुपये किमतीची विदेशी दारू आढळली. त्यानंतर पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याविरुद्ध मोर्चा वळविला. या वेळी तालुक्यातील इंचा शिवारात वाळूची अवैध वाहतूक करताना ट्रॅक्टर मालक गजानन काशिराम पडघान हा आढळून आला. त्याच्याकडून वाळू व ट्रॅक्टरसह ५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. कळमनुरी तालुक्यातील हातमाली शिवारात वाळूची अवैध वाहतूक करताना तीन ट्रॅक्टर आढळून आले. पोलिसांनी ट्रॅक्टर मालक गजानन लक्ष्मण भोयर (रा. हातमाली), ज्ञानेश्वर सुभाष मस्के (रा. डोंगरगाव नाका), गोविंद रामराव लोहटे (रा. हातमाली) याच्याकडून तीन ट्रॅक्टरसह तीन ब्राॅस वाळू असा १७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईनंतर दारू विक्रेते व वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहा. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पो.नि. उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, सपोउपनि बालाजी बोके, पो.ना. संभाजी लेकूळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, विठ्ठल कोळेकर, राजू ठाकूर, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, दीपक पाटील, आकाश टापरे, चालक प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.

Web Title: Police raid on sand thieves, including village liquor dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.