शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोषण ट्रॅकर ॲप अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

हिंगोली : केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पोषण ट्रॅकर हे नवीन ॲप आणले आहे. यामध्ये माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले ...

हिंगोली : केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पोषण ट्रॅकर हे नवीन ॲप आणले आहे. यामध्ये माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, माहिती भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणीही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केली आहे.

अंगणवाडीतील कामकाजाची माहिती शासनाला सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मे २०२० पर्यंत कॅस या ॲपमध्ये माहिती भरावी लागत होती. परंतु, मे पासून यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्याने ते बंद पडले. आता पुन्हा केंद्र शासनाने पोषण ट्रॅकर हे ॲप आणले आहे. यामध्ये आता माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोबाइलमध्ये पोषण ट्रॅकर ॲप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे खाजगी मोबाइलवर ॲप डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांकडे स्मार्ट मोबाइल उपलब्ध नाहीत. त्यामुळे माहिती भरताना अडथळा निर्माण होत आहे. डेटा रिचार्जचे पैसेही अनेक महिने येत नसून, ॲपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाही. दरम्यान, लाभार्थी बालकांचा आधारकार्ड क्रमांक जोडल्याशिवाय त्यांना पूरक पोषण आहाराचा लाभ मिळणार नाही. कर्मचाऱ्यांचे मानधनही पोषण ट्रॅकरला जोडण्यात आले आहे. त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. या संदर्भात कृती समितीने १९ मार्चला शासनाकडे निवेदन सादर केले होते. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट ॲपमध्ये माहिती न भरल्यास एप्रिल महिन्याचे मानधन न देण्याची व लाभार्थींना आहार न देण्याची धमकी प्रशासनाकडून दिल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शासनाने नवीन मोबाइल द्यावा, मानधन पोषण ट्रॅकरला जोडण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, ॲपमध्ये सर्व व्यवहार मराठीत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी कृती समितीने केली आहे. पोषण ट्रॅकरबाबतच्या अडचणी सुटेपर्यंत कर्मचारी शासकीय कर्तव्ये पार पाडतील. परंतु, पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्याचे काम न करण्याचा तसेच ५ ते ९ एप्रिलदरम्यान आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्याचा निर्णय कृती समितीने घेतल्याची माहिती एम. ए. पाटील. शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवान देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील आदींनी दिली आहे.