शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात टँकरची संख्या पोहोचली १८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:19 IST

पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली असल्याने आता टँकरची संख्या वाढली असून १८ वर पोहोचली आहे. तर अधिग्रहणांची संख्या १३0 वर गेली आहे. १0 गावे व २ वाड्यांना सध्या टँकर सुरू झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली असल्याने आता टँकरची संख्या वाढली असून १८ वर पोहोचली आहे. तर अधिग्रहणांची संख्या १३0 वर गेली आहे. १0 गावे व २ वाड्यांना सध्या टँकर सुरू झाले आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा दुष्काळात होरपळणाऱ्या भागात जानेवारीपासूनच टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मात्र कुठे प्रादेशिक योजना तर कुठे नवीन योजना टंचाईतील उपाययोजनेच्या मुळावर येत असल्याचे चित्र होते. आता जसजशी ओरड वाढत चालली तशा टंचाईच्या उपाययोजनाही सुरू झाल्या आहेत. सध्या हिंगोली तालुक्यातील कनका व लोहगावसाठी ३, कळमनुरीत माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु. या तीन गावांसाठी ३, सेनगावात शहरासह जयपूर, कहाकर खु. या तीन गावांसाठी ८ टँकर, वसमतला बाभूळगावसाठी २ तर औंढ्यात रामेश्वर या गावासह संघनाईक तांडा व काळापाणी तांडा या दोन वाड्यांसाठी २ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.एकूण २६ हजार लोकसंख्या टँकरवर तहान भागवत आहे. यात सर्वाधिक १४ हजार ५७0 जणांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सेनगाव शहरामुळे या तालुक्यात टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १४ खाजगी तर ४ शासकीय टँकर सुरू आहेत. त्यावर एकूण ४६ खेपा मंजूर असून यात हिंगोलीत ७, कळमनुरीत ८, सेनगावात २१, वसमतला ५ तर औंढ्यात ५ खेपा मंजूर आहेत. अधिग्रहणांची संख्या आता १३१ वर पोहोचली आहे. यामध्ये टँकरसाठी ११ अधिग्रहणे केली असून उर्वरित गावांसाठी स्त्रोत म्हणून वापरले जात आहेत. यात हिंगोलीत १९, कळमनुरी २२, सेनगाव २८, वसमत ४३, औंढा नागनाथ १९ अशी तालुकानिहाय अधिग्रहणांची संख्या आहे.इतर उपाययोजनांची पडताळणीटंचाईतील योजनांच्या दुरुस्तीसह पूरक योजना, टँकरचे प्रस्ताव आदी बाबींची पडताळणी करण्यास उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे. त्याची पडताळणी मागील पंधरा दिवसांपासून सुरू आहे. अद्याप त्याचा अहवाल आलेला नसल्याने हे प्रस्ताव तसेच आहेत. या कामांना ऐन टंचाईत विलंब होत आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीwater shortageपाणीटंचाई