शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड, परभणीने वाढविली जिल्ह्याची चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची टाळेबंदी लागू केली असून, आगारातून सुटणाऱ्या बसेसही बंद करण्याचे आदेश ...

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची टाळेबंदी लागू केली असून, आगारातून सुटणाऱ्या बसेसही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या बसेस अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे. मागच्या दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मृतांची संख्याही दोन आकडी झाली आहे. शेजारच्या परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. हे पाहून जिल्हा प्रशासनाने हिंगोली जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान टाळेबंदी घोषित केली आहे. यापूर्वी १ ते ७ मार्चदरम्यान टाळेबंदी घोषित केली होती. दोन्ही वेळेस तिन्ही आगारांतून सुटणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. परंतु या दरम्यान परजिल्ह्यातून येणाऱ्या बसेस चालूच होत्या. पहिल्या टाळेबंदीला परजिल्ह्यातून येणारी बस बसस्थानकात येत होती. पण, आजघडीला येत नाही. बसस्थानकावर येण्याऐवजी शहरातील थांब्यावर या बसेस बिनधास्तपणे थांबत आहेत. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.