करंजाळा येथील मटका जुगाऱ्यास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST2021-04-11T04:29:01+5:302021-04-11T04:29:01+5:30

हिंगोली तालुक्यातील करंजाळा येथील लोहगाव ते भोसी रोडवर मटका जुगार खेळविला जात असल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. ...

Matka at Karanjala caught the gambler | करंजाळा येथील मटका जुगाऱ्यास पकडले

करंजाळा येथील मटका जुगाऱ्यास पकडले

हिंगोली तालुक्यातील करंजाळा येथील लोहगाव ते भोसी रोडवर मटका जुगार खेळविला जात असल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सपोनि बी. आर. बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखली पो.उप.नि. भाग्यश्री कांबळे, अशोक धामणे, रवी हारकळ, सुरेश रणखांब यांच्या पथकाने १० एप्रिल रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून साहेबराव तुळशीराम बंदुके (रा. करंजाळा) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख ६ हजार ११० रुपये व १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा १६ हजार ११० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पो.उप. नि. भाग्यश्री कांबळे यांच्या फिर्यादीवरून साहेबराव तुळशीराम बंदुके याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोना चव्हाण करीत आहेत.

फोटो :

Web Title: Matka at Karanjala caught the gambler