विनापरवानगी लावले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST2021-03-20T04:28:18+5:302021-03-20T04:28:18+5:30

कळमनुरी : लग्नासाठी परवानगी न काढता १९ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास लग्न लावल्याप्रकरणी ८० जणांविरुद्ध गुन्हा ...

Married without permission | विनापरवानगी लावले लग्न

विनापरवानगी लावले लग्न

कळमनुरी : लग्नासाठी परवानगी न काढता १९ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास लग्न लावल्याप्रकरणी ८० जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तालुक्यातील अनिल नागरे यांच्या खेड येथील शेतशिवारात लग्न लावून दिल्याची घटना घडली. यामध्ये वधू-वराकडील ७० ते ८० जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तलाठी कीर्ती सूर्यकांत मसारे यांच्या फिर्यादीवरून नंदाबाई मुंडे, अनिल नागरे, बापुराव मुंडे, रामप्रसाद पुरी, विजय सावळे, अभिषेक घुगे, सुरेशराव घुगे, कलावती घुगे यांच्यासह टेंट व डेकोरेशनवाला, फोटोग्राफरसह जवळपास ८० जणांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

खेड येथे वर-वधूचा विवाह संपन्न करण्यासाठी एकत्र जमण्याची परवानगी काढणे आवश्यक असतानासुद्धा ती काढली नाही. परवानगी न काढताच लग्न लावून दिले. कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नायक पवन चाटसे हे करीत आहेत.

Web Title: Married without permission