थापाड्या सरकारमुळे मराठवाडा पोरका झाला: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 23:06 IST2018-10-27T23:05:49+5:302018-10-27T23:06:45+5:30

खोटी आश्वासने देवून सत्तेवर आलेल्या थापाड्या सरकारमुळे मराठवाडा पोरका झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी केली

Marathwada became the country after the Thapad government: Ashok Chavan | थापाड्या सरकारमुळे मराठवाडा पोरका झाला: अशोक चव्हाण

थापाड्या सरकारमुळे मराठवाडा पोरका झाला: अशोक चव्हाण

कळमनुरी (हिंगोली) : केंद्र व राज्यात भाजपाचे खोटारडे सरकार सत्तेत आहे. ४ वर्षात विकासाला खीळ बसली. खोटी आश्वासने देवून सत्तेवर आलेल्या थापाड्या सरकारमुळे मराठवाडा पोरका झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी येथे केली.
कळमनुरी येथे जनसंघर्ष यात्रेनिमित्त जाहीर सभा झाली. खा. राजीव सातव, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, रजनीताई सातव आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, नोकरदार, व्यापारी व सामान्य जनता असे सगळेच त्रस्त आहेत. फसवी कर्जमाफी केली. भाजपा व सेना हे भाऊ- भाऊ महाराष्ट्र वाटून खाऊ, अशी त्यांची भूमिका आहे. जलयुक्त शिवारातही त्यांनी हात साफ केले. जलयुक्त शिवारच्या कामामुळे पाणी वर येण्याऐवजी खाली गेले. खा. राजीव सातव हे माझे लहान भाऊ असून माझी ताकद त्यांच्या पाठीशी आहे. तुमचीही ताकद त्यांच्या पाठीशी ठेवा, असेही चव्हाण म्हणाले.

Web Title: Marathwada became the country after the Thapad government: Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.