शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी तालुक्यात संस्थात्मक प्रसूतीचा टक्का वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST

तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय १, प्राथमिक आरोग्य केंद्र ६ व ३१ आरोग्य उपकेंद्रे आहेत या वर्षात आतापर्यंत तालुक्यातील शासकीय ...

तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय १, प्राथमिक आरोग्य केंद्र ६ व ३१ आरोग्य उपकेंद्रे आहेत या वर्षात आतापर्यंत तालुक्यातील शासकीय रुग्णालयात १५२९ संस्थात्मक प्रसूती झालेल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात वर्षभरात ३६५ प्रसूती झाल्या आहेत. आखाडाबाळापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ४१२, डोंगरकडा १९०, मसोड १८१, पोतरा १८७, रामेश्वर तांडा ५१, वाकोडी ६, तर तालुक्यातील ३१ उपकेंद्रात १३७ संस्थात्मक प्रसूती झाल्या आहेत.

दुसरीकडे वाकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कमी प्रमाणात संस्थात्मक प्रसूती झाल्या आहेत. तालुक्यातील ३१ आरोग्य उपकेंद्रातही १३७ संस्थात्मक प्रसूती झाल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र व खासगी रुग्णालयात महिलांची प्रसूती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत बीपीएल व अनुसूचित जमातीच्या महिलांना प्रसूतीसाठी ७०० रुपये आर्थिक मदत दिल्या जाते. तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत संस्थात्मक प्रसूती झालेल्या सर्व लाभार्थी महिलांना ५ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत सर्वस्तरातील गरोदर व स्तनदा मातांना या योजनेचा लाभ दिला जातो.

अटींची पूर्तता करावी

शासनाने दिलेल्या अटींची पूर्तता केल्यास ३० दिवसांच्या आत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची रक्कम त्यांच्या ऑनलाइनद्वारे बँक खात्यावर जमा केली जाते. पहिल्या अपत्यासाठी मातेला पाच हजार रुपयाची आर्थिक मदत मिळते. यासाठी लाभार्थी मातेचे आधार संलग्न बँक खाते असणे गरजेचे आहे. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांना १०२ ॲम्ब्युलन्सची सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाते. तसेच एक वर्षापर्यंत बाळावर मोफत उपचार केल्या जाते, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेख रौफ यांनी दिली.