हिंगोलीत कोरोनाचा वाढता संसर्ग; आरोग्य पथकाने शहरात चाचण्यांचे प्रमाण वाढवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 02:07 PM2021-02-22T14:07:47+5:302021-02-22T14:10:29+5:30

corona virus infection in Hingoli हिंगोली शहरातील शास्त्रीनगर भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे या भागात बॅरिकेट लावून हा भाग प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे.

Increased corona virus infection in Hingoli; The health team increased the number of tests in the city | हिंगोलीत कोरोनाचा वाढता संसर्ग; आरोग्य पथकाने शहरात चाचण्यांचे प्रमाण वाढवले 

हिंगोलीत कोरोनाचा वाढता संसर्ग; आरोग्य पथकाने शहरात चाचण्यांचे प्रमाण वाढवले 

Next
ठळक मुद्देशास्त्रीनगर, श्रीनगर, बियाणी नगर यासह इतरही भागात कोरोना तपासणी करण्यात येत आहे. नगरपालिकेच्यावतीने पथकाची स्थापना करून कोरोना नियम पाळण्यासंदर्भात आवाहनही करण्यात येत आहे.

हिंगोली : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मागील चार दिवसांत जिल्ह्यात ५० च्या जवळपास रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागापेक्षा हिंगोली शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे शहरातील अनेक नगरात प्रशासनाच्यावतीने कोरोना चाचणी करण्यात येत आहेत. 

हिंगोली शहरातील शास्त्रीनगर भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे या भागात बॅरिकेट लावून हा भाग प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. या भागात नागरिकांची तसेच संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच नगरपालिकेच्यावतीने पथकाची स्थापना करून कोरोना नियम पाळण्यासंदर्भात आवाहनही करण्यात येत आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोनाचा संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र यासंदर्भात नागरिकांकडून ना मास्क, ना सॅनिटायझर, सामाजिक अंतर पाळण्यास विसर पडला आहे. यामुळे पुन्हा संसर्ग वाढत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्या तरी नागरिकांडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.

हिंगाेली शहरात अनेक ठिकाणी रूग्ण आढळून आल्याने शास्त्रीनगर, श्रीनगर, बियाणी नगर यासह इतरही भागात कोरोना तपासणी करण्यात येत आहे. याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, कनिष्ठ अभियंता तसनीम सनोबर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Increased corona virus infection in Hingoli; The health team increased the number of tests in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.