गॅसचा भाव वाढला : गावांत पुन्हा चुलीचा धुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:02+5:302021-02-23T04:46:02+5:30

हिंगाेली : कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशात अनेक वस्तूंच्या किमतींसह घरगुती गॅस वापरासाठी लागणाऱ्या सिलिंडरच्या ...

Gas price rises: stove chimney in the village again | गॅसचा भाव वाढला : गावांत पुन्हा चुलीचा धुराडा

गॅसचा भाव वाढला : गावांत पुन्हा चुलीचा धुराडा

हिंगाेली : कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशात अनेक वस्तूंच्या किमतींसह घरगुती गॅस वापरासाठी लागणाऱ्या सिलिंडरच्या किमती वाढल्याने, ग्रामीण भागातील गृहिणींचे आर्थिक गणित बिघडल्याचे पाहायला मिळत असून, गॅसच्या वाढत्या किमतीमुळे गावागावांत पुन्हा चुलीचा धुराडा सुरू झाल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान उज्ज्वला गॅसच्या शासकीय योजनेतून अनेकांना सवलतीत गॅस मिळाल्यामुळे अनेकांच्या घरातील चूल बंद झाली होती. मात्र, सध्या गॅसचे भाव गगनाला भिडल्याने आता पुन्हा ग्रामीण भागातील चुली पेटविल्या जात आहेत. दर आठ-ते पंधरा दिवसांना गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये २० ते ३० रुपयांनी वाढ हाेत आहे. मागच्या महिन्यातही गॅस सिलिंडरचे भाव ७२० रुपये हाेते. आता तर त्यामध्ये वाढ हाेत ७९५ रुपयांना गॅस मिळत आहे. भाव पुन्हा वाढल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री बसत असून, आर्थिक गणितही काेलमडत आहे.

मागच्या महिन्यातही वाढल्या गॅसच्या किमती

मागच्या महिन्यामध्ये गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ९० रुपयांनी वाढली आहे, तसेच ५ किलाेच्या छोट्या सिलिंडरच्या किमतीत १८० रुपयांची वाढ हाेत, आता ५०० रुपयांच्यावरच विक्री हाेत आहे. जानेवारी २०२० मध्ये ०००० तर जुलै २०२० मध्ये ०००० तर जानेवारीत ७२०, तर फेब्रुवारीत ९९५ रुपयाने गॅस विक्री हाेत आहे. यामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे, तसेच यापुढेही गॅसचे भाव कमी हाेतील, याची काही शाश्वती नाही.

‌‌“उज्ज्वला योजनेंतर्गत स्वयंपाक गॅस मिळाला आहे, त्यामुळे मागील काही दिवसांपासून चूल आणि धूर यातून सुटका मिळाली होती, परंतु सद्य:स्थितीत वरचेवर होत असलेली गॅसची दरवाढ, त्यामुळे आता गॅस परवडत नसून, पुन्हा चूलच वापरावी लागत असून, भाववाढीने सगळं विस्कळीत झालं आहे.”

रेवतीबाई चांगोजी खराटे, कौठा, ता. वसमत

“गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे आता पुन्हा एकदा चूल आणि सरपण याच्यावरच स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. आता तर गॅसचे दर इतके वाढले आहेत की, सिलिंडर संपल्यानंतर पुन्हा भरून घेतलाच नाही, आता तर सगळा स्वयंपाक चुलीवरच होत आहे.

नंदाबाई लोणाजी खराटे, काैठा, ता. वसमत

दिवसेंदिवस हाेत असलेली गॅसची दरवाढ आम्हा सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नाही. आता आम्हाला गॅसऐवजी चुलीवर भाकरी करण्याची वेळ आली आहे. यामुळे पुन्हा पहिल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्वाती लंकेश रणवीर, रा. पोत्रा, ता. कळमनुरी

सर्व गृहिणींना मोफत गॅस देतो, असे सांगून सर्व फसवणूक केली, माेफत तर सोडाचं, आहे त्या भावामध्ये माेठी वाढ केली. आमच्यासारख्या सामान्य गृहिणींचे महिन्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. आता तर खरच आमचे ‘अच्छे दिन’ आले आहेत, असे वाटत आहे.

शिवकांता देवानंद मुलगीर, रा. पोत्रा कळमनुरी

मागील वर्षभरात झालेली गॅसची दरवाढ, यामुळे आता गॅसचा वापर करणे नकाेसे झाले असल्याने पुन्हा चूल पेटविण्यात येत आहे. शासनाने गरिबासाठी सुरू केलेली उज्ज्वला गॅस याेजना ग्रामीण भागात आता पुन्हा चुलीवर येत असल्याची वास्तविकता दिसून येत आहे.

रत्नमाला बाबूराव माेरे, रा. अंभेरी, ता. कळमनुरी

फाेटाे नं. ०४

Web Title: Gas price rises: stove chimney in the village again