इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:28 AM2021-03-08T04:28:11+5:302021-03-08T04:28:11+5:30

कधी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पेट्रोल व डिझेल दरवाढ, महागाईचे चांगलेच त्रस्त केले आहे. यामुळे इंधन दरवाढीचा ...

Fuel price hike hits farmers | इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका

इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका

Next

कधी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पेट्रोल व डिझेल दरवाढ, महागाईचे चांगलेच त्रस्त केले आहे. यामुळे इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तसेच अनेकांकडील जनावरांची हाेत असलेली कमी संख्या, बैलांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना नांगरणी, मळणी, पेरणी आदी कामे ट्रॅक्टरद्वारेच करावी लागत आहे. डिझेल दरवाढ झाल्याने ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरच्या मळणी यंत्राद्वारे हरभरा, गहू काढणी सुरू आहे. पोत्याला २५० रुपये काढणीचा दर असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पर्यायाने इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पंपावर पेट्रोल १०० रुपयाच्या जवळपास दर गेले असून ग्रामीण भागात ११० रुपये लीटरप्रमाणे खुली विक्री होत आहे. यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसत आहे. फाेटाे नं. ०१

Web Title: Fuel price hike hits farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.