शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

चड्डी-बनियन टोळीची हॉस्पिटलमध्ये जबरी चोरी;कंपाउंडर, डॉक्टरला मारहाण,लाखोंचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 5:21 PM

दागिने कुठे आहेत? पैसे कुठे आहेत? असे विचारून, तुम्ही जर आम्हाला दागिने, पैसे दिले नाहीत, तर तुमच्या मुलाला मारू, अशी धमकी दिली.

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देशमुख हॉस्पिटलमध्ये जबरी चोरी करून कंपाउंडर, डॉक्टरलाही टाॅमीने मारहाण केली. सोन्याचे दागिने व नगदी दोन लाख रुपये रोकड असा जवळपास चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. चड्डी बनियन गँगच्या चोरट्यांनी बाळापूर परिसरात दहशत निर्माण केली. चोरीचे प्रकार वाढल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

आखाडा बाळापूर येथील नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर बसस्टँडच्या पाठीमागे डॉ. सचिन देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल आहे. खाली दवाखाना व वर निवासस्थान असलेल्या या हॉस्पिटलमध्ये २४ जुलै रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी पाठीमागच्या बाजूने प्रवेश केला. कंपाउंडरला मारहाण करून जखमी केले. पैसे, दागिने कुठे आहेत ते सांग, असे म्हणून त्याला फरपटत वर नेले. त्याला एका टेबलवर झोपवून आवाज न करण्याची तंबी दिली. एक चोरटा कंपाउंडर जवळ थांबला, तर दोघे वर गेले. शोधाशोध करत असताना आवाज झाल्याने, डॉ. देशमुख यांना चोरटे घरात शिरल्याचा अंदाज आला. त्यांनी झटपट पुन्हा बेडरूमचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला; पण चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. हातात असलेल्या टॉमीने डॉ. देशमुख यांच्यावर वार केला. त्यांनी डोक्यातला वार चुकविला; पण पाठीमध्ये त्यांना मार बसला. उजव्या पायावरही टाॅमीने मारहाण केली. त्यानंतर, डॉक्टर शांत बसले. दागिने कुठे आहेत? पैसे कुठे आहेत? असे विचारून, तुम्ही जर आम्हाला दागिने, पैसे दिले नाहीत, तर तुमच्या मुलाला मारू, अशी धमकी दिली. त्यानंतर, गळ्यातले लॉकेट, कुटुंबीयांचे दागिने असे आठ तोळ्यांचे दागिने त्यांनी चोरून नेले.

चड्डी-बनियन व चेहऱ्याला मोठा मास्क लावलेल्या चोरट्यांची दहशतडॉ. देशमुख यांनी घरात ठेवलेली अडीच ते तीन लाख रुपयांची रक्कमही घेऊन चोरटे पसार झाले. दरम्यान, पोलिसांच्या वाहनाच्या सायरनचा आवाज येताच चोरट्यांनी पाठीमागच्या बाजूनेच पळ काढला. तीन चोरटे चार लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले. बाळापूर परिसरात चोरटे घुसल्याची खबर एक ते दीड वाजताच पोलिसांना मिळाली. साईमंदिर परिसरातील माधवनगरमध्ये चार ते पाच घरांची कडी-कोयंडे बाहेरून लावून घेतल्याने चोरटे आले असल्याचे गल्लीत समजले. पोलिसांनी शेवाळा, देवजना, कवडी या भागांतील ग्रामस्थांना जागे केले. दोन चोरटे देवजना गावात आले असल्याचे कळताच पोलिसांची गाडी तिकडे रवाना झाली. त्याच दरम्यान दुसऱ्या तीन चोरट्यांनी डॉ. सचिन देशमुख यांच्या दवाखान्यात धुडगूस घातला. चड्डी-बनियन व चेहऱ्याला मोठा मास्क लावलेल्या चोरट्यांनी बाळापूर परिसरात दहशत निर्माण केली आहे.

याप्रकरणी चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या कंपाउंडर विकास घोडगे याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनीही घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले; पण श्वानपथक जागेवरच घुटमळले. याप्रकरणी डॉक्टर सचिन देशमुख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे बंद....दवाखान्यात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बसविली आहे; परंतु दोन दिवसांपूर्वी त्याची स्क्रीन बंद झाल्याने दुरुस्ती करण्यासाठी हे कॅमेरे बंद ठेवले असल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहिले असते तर कदाचित चोरट्यांना त्यात टिपता आले असते. पोलिसांना तपासात मदत झाली असती; पण दोन दिवसांपूर्वीच नादुरुस्त झाल्याने ते बंद ठेवले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली