कळमनुरी, हिंगोलीतील कोविड सेंटरमध्ये सुविधा मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:29 AM2021-04-10T04:29:15+5:302021-04-10T04:29:15+5:30

हिंगोली : हिंगोली व कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये रूग्णांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच कळमनुरी येथील कोविड सेंटरमध्ये ...

Facilities are not available at Kovid Center in Kalamanuri, Hingoli | कळमनुरी, हिंगोलीतील कोविड सेंटरमध्ये सुविधा मिळेनात

कळमनुरी, हिंगोलीतील कोविड सेंटरमध्ये सुविधा मिळेनात

Next

हिंगोली : हिंगोली व कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये रूग्णांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच कळमनुरी येथील कोविड सेंटरमध्ये विविध डॉक्टरांच्या नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी माजी आ. गजानन घुगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, हिंगोली व कळमनुरी तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, कळमनुरी येथील कोविड सेंटरची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रूग्णांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याने नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे १०० बेडची क्षमता असताना १२५ रूग्ण दाखल झाले आहेत. प्रत्येक कोविड सेंटरला प्रत्येकी एका भूलतज्ज्ञ, फिजीशियन, एम.डी. डाॅक्टरांची आवश्यकता असताना कळमनुरी येथे कार्यन्वित असलेल्या एका डॉक्टराची प्रतिनियुक्ती हिंगोली येथे करण्यात आली आहे. केवळ डॉक्टराअभावी वेळेवर सुविधा मिळत नसल्याने चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्हा रूग्णालयात रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध असतानाही मान्यता दिलेल्या कोविड सेंटरला पुरवठा केला जात नाही. त्यामुळे इंजेक्शन खुल्या बाजारातून चढ्या दराने खरेदी करावे लागत आहे. ८ एप्रिल रोजी तर जिल्हा रूग्णालयातील कोविड सेंटरमध्ये पाणी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कळमनुरी येथील कोविड सेंटरमध्ये १२ एप्रिलपर्यंत भूलतज्ज्ञ, फिजीशियन, एमडी डॉक्टरांची पदे भरावीत, कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आखाडा बाळापूर ग्रामीण रूग्णालयात कोविड सेंटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अन्यथा कळमनुरी कोविड सेंटरसमोर कार्यकर्त्यांसोबत उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याने लसीकरण वेगावे वाढवावे, अशी मागणी करीत नागरिकांनीही कोरोना लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Facilities are not available at Kovid Center in Kalamanuri, Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.