शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

हद्दपार आरोपीचा घरीच मुक्काम; पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर नातेवाईकांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 19:35 IST

वसमत येथील प्रकार; एक कर्मचारी किरकोळ जखमी

वसमत: हद्दपारीचे आदेश असताना एकजण घरी राहत असल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर कुटूंबीयांनी हल्ला चढवला. यात एक पोलिस अंमलदार किरकोळ जखमी झाला. ही घटना वसमत शहरात ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८:२० वाजता घडली. 

वसमत येथील जोगिंदरसिंग रणजितसिंग चव्हाण (रा. स्टेशन रोड वसमत) यास हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तरीही तो हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून घरीच राहण्यासाठी आला असल्याची माहिती वसमत शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वसमत शहरचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांचे पथक त्याला पकडण्यासाठी गेले होते. यात  पोलिसांनी जोगिंदरसिंग चव्हाण यास पकडले. या वेळी रणजितसिंग रतनसिंग चव्हाण याने चाकूचा धाक दाखवून पथकाला धक्काबुक्की केली.

तसेच रणजितसिंग, कमलकौर चव्हाण, सुलिदरसिंग चव्हाण यांनी पोलिस अंमलदार राजू गुठ्ठे यांचा हात मुरगाळून बळाचा वापर करून जोगिंदरसिंग चव्हाण यास पळवून लावले. पोलिसांनी यावेळी रणजितसिंग चव्हाण याच्या जवळील खाली पडलेला चाकू ताब्यात घेतला. या प्रकरणी राजू गुठ्ठे यांच्या फिर्यादीवरून रणजितसिंग चव्हाण, कमलकौर चव्हाण, सुलिदरसिंग चव्हाण, जोगिंदरसिंग चव्हाण (चौघे रा. स्टेशन रोड वसमत) याचेविरूद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी व शासकीय कर्तव्यापासून परावृत करण्यासाठी चाकूचा धाक दाखवून धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक मांजरमकर तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली