शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

हिंगोली: बेसुमार झाडांच्या तोडीमुळे जंगलाचा ऱ्हास होऊ लागला आहे. हे दृष्टीआड करून चालणार नाही. यासाठी झाडांची जोपासणा करणे गरजेचे ...

हिंगोली: बेसुमार झाडांच्या तोडीमुळे जंगलाचा ऱ्हास होऊ लागला आहे. हे दृष्टीआड करून चालणार नाही. यासाठी झाडांची जोपासणा करणे गरजेचे आहे. जंगल वाचले तर आपल्याला स्वच्छ हवा, पाणी मिळेल. एवढेच काय ‘वर्ल्ड फॉरेस्ट डे’ साजरा केल्याचे समाधान मिळेल.

चंगळवादी जीवनशैलीसाठी होत असलेल्या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकापासून जाणवू लागले. त्यातून जंगले वाचविण्याची संकल्पना पुढे आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संयुक्त संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी ‘वर्ल्ड फाॅरेस्ट डे’ साजरा करण्यास सुरुवात केली.

‘दृष्टीआड सृष्टी’ असे आपण नेहमीच म्हणत असलो तरीपण या सृष्टीच्या आड असे काय आहे? जे आपल्याला दिसत नाही. अशा कितीतरी गोष्टी सृष्टीची चक्रे फिरवत असतात. यामध्ये दगड, माती, हवा, पाणी असे निर्जीव घटक आहेत. त्याचप्रमाणे झाडे, किडे, साप, मासे आणि माणूसप्राणी असे विविध सजीवही आहेत.

२००२ साली जंगल संवर्धनासाठी जैवविविधता कायदा मंजूरही करण्यात आला आहे. त्यानंतर सामूहिक वनहक्क कायदाही तयार केला. आदिवासींचे व इतर परंपरेने राहणाऱ्या आणि जंगलांचे संवर्धन करणाऱ्या वन निवासीयांना जंगलावरील हक्क याला मंजुरीही देण्यात आली. वनाचे संरक्षण व्हावे, यासाठी गावोगावी समित्याही स्थापना करण्यात आलेल्या आहेत.

समित्यांनी पुढाकार घेणे गरजेचे

कंटाळा करून चालणार नाही. जागतिक वन दिन वर्षानुवर्षे आपण साजरा करू; पण जंगलातील झाडे वाचविणेही गरजेचे आहे. हे नेमलेल्या समितीने लक्षात घेणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानावर भविष्यात उपाययोजना करताना आणि धोरण ठरवताना जंगलांबाबत योग्य विचार होतो आहे का? याची शहनिशा करणेही तितकेच गरजेचे आहे.

१५ हजार झाडांची केली जाते जोपासना

हिंगोली हा मराठवाड्यातील सर्वात लहान जिल्हा असला तरी आजमितीस येथील वन विभागात १५ हजार झाडांची जोपासणा केली जाते. यामध्ये निंब, बाभूळ, आवळा, कवठ, बेहडा, वड, साग आणि वनौषधी झाडांची चांगल्या पद्धतीने जोपासणा केली जाते. हिंगोलीचे वनक्षेत्र ०.५० हेक्टरवर वसलेले असल्याचे विभागीय वनाधिकारी कामाजी पवार, वन परीक्षेत्र अधिकारी व्ही. बी. टाक, वन परिमंडळ अधिकारी जी. पी. मिसाळ यांनी संगितले.

देशी झाडांची लागवड करावी

सततची दुष्काळजन्य परिस्थिती, शेती व्यवसायाची ढासळलेली स्थिती यामुळे आपले अतोनात नुकसान होत आहे, तसेच पर्यावरण साखळीचे मोठे नुकसान होत आहे. गिलरसिडिया, काशीद, ऑस्ट्रेलियन बाभूळ इत्यादी झाडांवर कोणताही पक्षी बसत नाही. एवढेच काय घरटे बांधत नाही. या पक्ष्यांना या झाडांवर त्यांचे अन्न मिळत नाही, तसेच या झाडांखाली वन्यप्राण्यांसाठी चारा निर्माण होत नाही. त्यामुळे या झाडांवर अवलंबून असलेले अनेक पक्षी व प्राणी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

-विश्वांबर पटवेकर, सर्पमित्र, हिंगोली.