नशेत पोटात सुरी मारून घेतल्याने इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:32 IST2018-04-20T00:32:01+5:302018-04-20T00:32:01+5:30
दारूच्या नशेत स्वत:च्या पोटात सुरी मारून घेतलेल्या इसमाचा अखेर हिंगोली शहरातील बावनखोली येथे १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला.

नशेत पोटात सुरी मारून घेतल्याने इसमाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दारूच्या नशेत स्वत:च्या पोटात सुरी मारून घेतलेल्या इसमाचा अखेर हिंगोली शहरातील बावनखोली येथे १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेरोज नूरखॉ पठाण (३५) असे मयताचे नाव आहे. हैदराबाद येथील अलसना बीफ कंपनी जलपल्ली येथे फेरोज पठाण याने राहत्या घरात १३ एप्रिल रोजी दारूच्या नशेत स्वत:च्या पोटामध्ये सुरी मारून घेतल्याची घटना घडली होती. जखमी पठाण यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू होते. १७ एप्रिल रोजी फेरोज पठाण यांना हिंगोली येथील बावनखोली येथे नातेवाईकाच्या घरी आणले. परंतु पठाण यांच्या प्रकृतत सुधारणा झाली नाही. अखेर १९ एप्रिल रोजी जखमी फेरोज पठाण यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपविभागीय पो. अधिकारी राहूल मदणे, पोनि जगदीश भंडरवार, पोउपनि पी. एस. गोमाशे आदींनी भेट दिली. याप्रकरणी शेख अकबर शे. मोहम्मद जाफर यांच्या खबरीवरून ठाण्यात नोंद झाली.