हत्ता येथील खून प्रकरणी तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:09+5:302021-04-09T04:32:09+5:30

सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथे नितीन सतीष ठोके यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे यासाठी आणलेले बांधकाम साहित्य महेंद्र ...

Crime against three in Hatta murder case | हत्ता येथील खून प्रकरणी तिघांवर गुन्हा

हत्ता येथील खून प्रकरणी तिघांवर गुन्हा

सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथे नितीन सतीष ठोके यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे यासाठी आणलेले बांधकाम साहित्य महेंद्र किशन ठोके यांच्या घरासमोर अस्ताव्यस्त टाकले होते. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यातूनच नितीन सतीष ठोके याने धारदार हत्याराने महेंद्र ठोके यांच्यावर वार केले. यामध्ये महेंद्र ठोके यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरा राहूल किशन ठोके यांच्या फिर्यादीवरून नितीन सतीष ठोके, पुंजाजी मरीबा ठोके, रमाबाई पुंजाजी ठोके यांच्या विरूद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. घटनेचा तपास पो.उप.नि. जाधव करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी वाखारे, पो.नि. पाटील, पो.उप.नि. जाधव, माकणे आदींनी घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा केला.

Web Title: Crime against three in Hatta murder case