coronavirus : हिंगोलीत मुंबईहून परतलेले आणखी सहा कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:01 AM2020-05-23T10:01:39+5:302020-05-23T10:02:11+5:30

मुंबईहून परतणारे अनेक जण पॉझिटिव्ह येत असून त्यामुळे जिल्हाभरात ग्रामस्थ सतर्क आहेत

coronavirus: Six more coronavirus infected who returned from Mumbai in Hingoli | coronavirus : हिंगोलीत मुंबईहून परतलेले आणखी सहा कोरोनाबाधित

coronavirus : हिंगोलीत मुंबईहून परतलेले आणखी सहा कोरोनाबाधित

Next

हिंगोली: जिल्ह्यात आणखी सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, आता उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 18 वर पोहोचली आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या एकशे सातवर पोहोचली आहे. यापैकी 89 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये औंढा तालुक्यातील देवळा येथील एक तर उर्वरित वसमत तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे. वसमत विलगीकरण सेंटरमधील हे पाच जण मुंबईवरून परतलेले आहेत. तर देवळा येथील इसमही मुंबईला आला होता. औंढा येथील वैद्यकीय अधीक्षकांनी दोन दिवस त्यांची तपासणी केली नसल्याचा प्रकार घडला होता. आता ह्या लोकांना कोरोना असल्याचे समोर आले आहे. मात्र गावात खबरदारी घेतली असल्याने गावात कुणाशी संपर्क आला नव्हता.

मुंबईहून परतणारे अनेक जण पॉझिटिव येत असून त्यामुळे जिल्हाभरात ग्रामस्थ सतर्क आहेत तपासणीशिवाय अथवा शासकीय विलगीकरण केल्याशिवाय अशांना गावात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे अनेकदा वादही होत असले तरी गावाची सुरक्षा मात्र होत आहे. हॉटस्पॉट भागातून काम करून आलेल्यांनी आरोग्य तपासणी करूनच गावात जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आह.

Web Title: coronavirus: Six more coronavirus infected who returned from Mumbai in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.