Coronavirus : हिंगोलीत एक नवा रुग्ण, पाच कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:18 IST2020-05-28T21:17:02+5:302020-05-28T21:18:19+5:30

वसमत तालुक्यात आढळला रुग्ण

Coronavirus: A new patient in Hingoli, five coronavirus free | Coronavirus : हिंगोलीत एक नवा रुग्ण, पाच कोरोनामुक्त

Coronavirus : हिंगोलीत एक नवा रुग्ण, पाच कोरोनामुक्त

हिंगोली : जिल्ह्यात वसमत तालुक्यातील गिरगाव येथे आणखी एक कोरोनाबाधित आढळला असून तो मुंबईहून परतलेला आहे. तर वसमत तालुक्यातील पाच जण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १६६ तर बरे झालेल्यांची संख्या ९६ झाली आहे. ७0 रुग्ण उपचार घेत आहेत. वसमत तालुक्यातील गिरगाव येथील एकजण नव्याने पॉझिटिव्ह आढळला तर याच तालुक्यातील वापटीचे ५ जण बरे होवून घरी परतले आहेत.

Web Title: Coronavirus: A new patient in Hingoli, five coronavirus free