शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रोखायचा, पण निधी कोठून आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यासह शहरातही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रोखण्यासाठी नगरपालिका विविध उपाययोजना राबवित आहे. मात्र जिल्हा ...

हिंगोली : जिल्ह्यासह शहरातही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रोखण्यासाठी नगरपालिका विविध उपाययोजना राबवित आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून कोरोना उपाययोजनांसाठी वेगळा निधी सध्या तरी उपलब्ध झाला नसल्याने नगरपालिकेच्या निधीतून खर्च करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हिंगोली शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान शहरात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले होते. आजार पसरू नये यासाठी नगरपालिकेनेही विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरातील स्वच्छता, रस्ते, गल्ली निर्जंतुकीकरणासाठी फवारणी, पीपीई किट, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी बॅनर उपलब्ध करून देणे, मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, कोरोना काळात मृत्यू झालेल्या अनोळखी व्यक्तींचे अंत्यसंस्कार करणे आदी कामे केली जात आहेत. यासाठी नगरपालिकेला मोठा खर्चही येत आहे. दर महिन्याला जवळपास १५ लाखापर्यंत खर्च जात आहे. हा खर्च सध्या तरी नगरपालिकेच्या उपलब्ध निधीतून होत आहे. परंतु, आणखी काही महिने कोरोनाची अशीच परिस्थिती राहिल्यास कोरोना उपाययोजनांसाठी निधी आणायचा कोठून, असा प्रश्न पालिकेसमोर उभा राहत आहे.

निधीची अडचणीने परिणाम

हिंगोली नगरपालिकेला जवळपास महिन्याला १० ते १५ लाख रुपयांचा खर्च कोरोना उपाययोजनांसाठी येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप यासाठी वेगळा निधी मिळाला नसला तरी नगरपालिकेला १४ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीच्या व्याजाची रक्कम कोरोना उपाययोजनासाठी खर्च करण्याची परवानगी द्यावी, अशी जिल्हा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे.

सूचना मिळाल्यास कोविड केअर सेंटर वाढविले जाणार

हिंगोली नगरपालिकेच्या वतीने अंधारवाडी परिसरात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. सध्या तरी शहरातील कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता कोविड केअर सेंटर पुरेसे ठरत आहे. मात्र रुग्ण संख्या आणखीन वाढल्यास आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार कोविड केअर सेंटर वाढविता येतील, असे सांगण्यात आले.

हिंगोली नगरपालिकेच्या वतीने कोरोना उपाययोजनांसाठी जवळपास १० ते १५ लाख रुपयांचा खर्च येत आहे. हा खर्च नगरपालिकेच्या निधीतून भागविला जात असला तरी १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या व्याजाची रक्कम कोरोना उपाययाेजनांसाठी खर्च करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

- डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकार

कोरोना उपाययोजनासाठी महिन्याला पालिकेला किती निधी लागतो

१५ लाख

जिल्ह्यातील एकूण रुग्ण -

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण -

शहरात उपचार सुरू असलेले रुग्ण -