शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने दाेघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. १८ मार्च रोजी नव्याने ८७ रुग्ण आढळले असून ७० जण ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. १८ मार्च रोजी नव्याने ८७ रुग्ण आढळले असून ७० जण बरे झाले आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने वसमत तालुक्यातील दाेघांचा मृत्यू झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात अँटीजन चाचणीत आज ३१ रुग्ण आढळून आले आहेत. हिंगोलीत ७२ पैकी ९ रुग्ण आढळले. यात न.प.कॉलनी १, श्रीनगर १, सामान्य रुग्णालय २, हिंगोली १, जंतूर १, एनटीसी १, नेहरूनगर १ यांचा समावेश आहे. कळमनुरीत ११६ पैकी १९ बाधित आढळले. यात परभणी १, कळमनुरी २, नागपूर २, हातमाली १, हिंगोली २, हदगाव २, नांदेड २, आखाडा बाळापूर १, कळमनुरी ४, शेनोडी १ यांचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यात ६३ पैकी ३ बाधित आढळले. यात कापडसिंगी, शेनोडी व सेनगाव येथील प्रत्येकी एक आहे. वसमतला ५८ तर औंढ्यात १३ पैकी एकही बाधित नाही.

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात २८ बाधित आढळले. यात शस्त्रीनगर १, कोमटी गल्ली १, गोविंदनगर १, रिसाला बाजार २, आदर्श कॉलेजजवळ २, एनटीसी ६, जुने पोलीस ठाणे १, आनंदवाडी १, हिलटॉप कॉलनी २, रेल्वे क्वार्टर १, टाले हॉलजवळ २, संत नामदेवनगर २, लाख १, बाभूळगाव १, हिंगोली १ यांचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगावात ३, वसमत तालुक्यातील अकोलीत ७, औंढा तालुक्यातील रामेश्वर ७ व वगरवाडी १, कळमनुरी येथील ७ तर हदगावचे ३ असे एकूण ५६ रुग्ण आढळून आले आहेत.

बरे झाल्याने घरी सोडलेल्यांमध्ये हिंगोली सामान्य रुग्णालयातून २८, लिंबाळा कोरोना केअर सेंटरमधून १४, कळमनुरीतून २२ तर औंढा येथून ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णलयाच्या आयसोलेशन वार्डात दाखल असलेल्या वसमत तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला. यात पांगरा येथील ६० वर्षीय पुरुष तर लिंगपिंपरी येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामुळे आजपर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा ७१ वर पोहोचला आहे.

आजपर्यंत कोरोनाचे एकूण ५०६१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४५३७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. तर सध्या ४५३ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ३५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. तर ८ जणांना बायपॅप मशिनवर ठेवण्यात आले आहे.

वाढते मृत्यू चिंताजनक

मागील पंधरा दिवसांच्या काळात जवळपास दहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढत चालल्याने ही बाब चिंताजनक बनली आहे. १ मार्च रोजी मृत्यूचा आकडा ६० होता. आज तो ७१ वर गेला आहे.