शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

बडे दिलवाला शेतकरी! हिंगोलीत भीषण उन्हात थंडाव्यासाठी म्हशींसाठी उभारला 'स्विमिंग पूल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:13 IST

८० म्हशींसाठी 'वॉटर पार्क' उभारणारा हिंगोलीचा प्रगतशील शेतकरी

हिंगोली : गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पार गेला असून, भीषण उकाड्याचा फटका केवळ मानवालाच नाही, तर मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. विशेषतः म्हशींना वाढत्या तापमानाचा सर्वाधिक त्रास होतो. यावर उपाय म्हणून हिंगोली तालुक्यातील बेलवाडी येथील प्रगतशील शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी आपल्या गोठ्यात चक्क म्हशींसाठी स्विमिंग पूल उभारून पशुधनाप्रती असलेल्या प्रेमाचा एक आगळावेगळा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.

रामेश्वर मांडगे हे मागील ५० वर्षांपासून दुग्धव्यवसायात कार्यरत असून पंचक्रोशीत त्यांची प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख आहे. महाराष्ट्र शासनाकडूनही त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या दुधाळ व्यवसायात ८० मोठ्या आणि ३० लहान म्हशी असून दररोज सुमारे ४०० ते ४५० लिटर दूध उत्पादन घेतले जाते. त्यांच्या या व्यवसायात कुटुंबातील सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग आहे. कठोर परिश्रम, नियोजन आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब यांमुळे मांडगे कुटुंबाने दुग्धव्यवसायात यशस्वी वाटचाल केली आहे. सध्या त्यांनी उभारलेला म्हशींसाठीचा स्विमिंग पूल हा परिसरात चर्चेचा विषय ठरत असून इतर पशुपालकांनाही यापासून प्रेरणा मिळत आहे. जनावरांप्रती असलेले प्रेम आणि त्यांची काळजी घेण्याची ही आगळीवेगळी पद्धत निश्चितच कौतुकास्पद ठरली आहे.

म्हशींसाठी ‘वॉटर पार्क’चा अनुभवपशुतज्ज्ञांच्या मते, म्हशींची त्वचा काळी असल्याने त्यांना उष्णता अधिक जाणवते. तापमान सहन न झाल्यास म्हशींचे दूध कमी होणे, इतकेच नव्हे तर गाभण म्हशींचा गर्भपात होण्याचाही धोका असतो. हीच जोखीम ओळखून रामेश्वर मांडगे यांनी आपल्या ८० मोठ्या आणि ३० लहान म्हशींसाठी एक प्रशस्त स्विमिंग पूल बांधला आहे. केवळ पाणी साठवून न थांबता, त्यांनी या पुलावर थंड पाण्याचे शॉवरदेखील बसवले आहेत.

वाढत्या तापमानापासून दिलासाजनावरे बोलू शकत नाहीत, पण त्यांनाही वेदना होतात. कडक उन्हामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी आम्ही स्विमिंग पूल आणि त्यावर थंड पाण्याचे शाॅवर बसवले आहेत; त्यामुळे म्हशींना वाढत्या तापमानापासून दिलासा मिळत आहे. शिवाय दुधाचे प्रमाणही स्थिर राहण्यास मदत झाली आहे.- रामेश्वर मांडगे, दूध उत्पादक शेतकरी, बेलवाडी

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer builds swimming pool for buffaloes to beat the heat.

Web Summary : Hingoli farmer Ramेश्वर Mandge, facing extreme heat, built a swimming pool for his buffaloes. This innovative approach keeps the animals cool, maintains milk production, and showcases animal love. Mandge's initiative inspires other dairy farmers.
टॅग्स :HingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी