शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आओ जाओ घर तुम्हारा ! दुपारी तीन वाजेनंतर तपासणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

कोरोना आजार वाढू लागला; कोरोना कसा रोखणार? हाही यक्ष प्रश्न हिंगोली: जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने ...

कोरोना आजार वाढू लागला; कोरोना कसा रोखणार? हाही यक्ष प्रश्न

हिंगोली: जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले असतानाही तपासणी मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच होताना दिसून येत आहे. त्यानंतर बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथे प्रवासी बिनधास्त फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना कसा रोखणार? हा प्रश्न पडला जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहताच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी १ ते ७ मार्च दरम्यान सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. या दरम्यान, जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारातील बसेस बाहेरगावी सोडण्याचे बंद केले होते. असे असताना पर जिल्ह्यातील बसेस मात्र आगारात येऊन जात होत्या. जिल्हा प्रशासनाने १ मार्चपासून बसमधून आलेल्या प्रवाशांची तसेच जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, ही वेळ तीन वाजेपर्यंतची देण्यात आली आहे. त्यामुळे तीन नंतर मात्र सर्वकाही आलबेल असल्याचे पहायला मिळत आहे.

बॉक्स

लांब पल्ल्याच्या गाड्यांची तपासणी नाही

पुणे, सोलापूर, औरंगाबाद या लांब पल्ल्याच्या बसेस तिन्ही आगारातून सोडण्यात येत आहेत. परंतु, आलेल्या व जाणाऱ्या प्रवाशांची काही तपासणी होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे बहुतांश प्रवासी हे विनामास्कच बसेसमध्ये चढत असल्याचे पहायला मिळत आहे.

इतर राज्यातील बसेस सुरू; पण तपासणी होईना

हिंगोली ते हैदराबाद आणि वसमत ते हैदराबाद ही बस १ ते ७ मार्च नंतर सुरू करण्यात आली आहे. ही बस पर राज्यात जात असल्यामुळे प्रवासी संख्याही या बसला मोठ्या प्रमाणात असते. परंतु, म्हणावी तेवढी काही काळजी घेतली जात नाही. कोरोना आजार वाढू लागल्याने महामंडळाने बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना मास्क असल्याशिवाय प्रवेश देऊ नये. यासाठी महामंडळाने चालक, वाहकांना सूचना देणे गरजेचे आहे.

कोरोना तपासणीची वेळ वाढविली जाईल

जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण वाढलेले पाहून १ मार्चपासून बसस्थानकात उतरलेल्या व जाणाऱ्या प्रवाशांची अँटिजन तपासणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाचे पथक नेमण्यास सांगण्यात आले. सर्व बसस्थानकात ही पथके राहतील. शिवाय बसस्थानकातच बस आणून उभी करायची असल्याने सीमेवर तपासणी नाही. जर तीननंतर तपासणी होत नसेल तर तशा सूचना दिल्या जातील.

-रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, हिंगोली