शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी तालुक्यात ९३ ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST

४ जानेवारी रोजी ४५९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. ७६१ सदस्यांच्या जागेसाठी १६२७ उमेदवार निवडणूक रिंगणात ...

४ जानेवारी रोजी ४५९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. ७६१ सदस्यांच्या जागेसाठी १६२७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी १८ जानेवारी रोजी तहसील कार्यालय येथे होणार आहे. १०९ ग्रामपंचायतींमध्ये ७३ हजार ४२१ पुरुष व ६६ हजार ७८८ महिला मतदार आहेत. ९३ ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी अथवा तिरंगी लढती पाहावयाला मिळणार आहेत. सध्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, आता उमेदवार प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.

तालुक्‍यातील १९ मतदान केंद्रे संवेदनशील असून या मतदान केंद्रांवर पोलिसांची जादा कुमक ठेवण्यात येणार आहे. पोलिसांची करडी नजर या मतदान केंद्रांवर राहणार आहे. १०९ ग्रामपंचायतींसाठी ३५४ मतदान केंद्रे असून कर्मचाऱ्यांना २ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेबाबत पहिले प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणाला १९ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. या कर्मचाऱ्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात अटीतटीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. पाडापाडीचे राजकीय डाव आखण्यात येत आहेत. ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. जागोजागी कार्यकर्ते जमा होत आहेत. कार्यकर्ते सांभाळताना गावपुढाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. पैशांची उधळपट्टी आतापासून सुरू आहे. उमेदवार मतदारयाद्यांकडे लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आता उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांची हात जोडून मतांसाठी विनवणी करीत आहेत. मतदान मागण्यासाठी आलेल्या सर्वच उमेदवारांना मतदारही हो म्हणून वेळ मारून नेत आहेत. तालुक्‍यातील १६ ग्रामपंचायतींतील ११४ सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांनी ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी भरलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त थकबाकी वसूल झालेली आहे. राजकीय कुस्त्यांचे फड गावोगावी चांगलेच रंगलेले दिसत आहेत.