येत्या चार दिवसांत मराठवाड्यात पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST2021-05-06T04:31:45+5:302021-05-06T04:31:45+5:30

हिंगोली : येत्या चार दिवसांमध्ये म्हणजे ६ ते ९ मे या कालावधीत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वारा व काही ...

Chance of rain in Marathwada in next four days | येत्या चार दिवसांत मराठवाड्यात पावसाची शक्यता

येत्या चार दिवसांत मराठवाड्यात पावसाची शक्यता

हिंगोली : येत्या चार दिवसांमध्ये म्हणजे ६ ते ९ मे या कालावधीत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वारा व काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पावसाची शक्यता आहे, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाने वर्तविला आहे.

६ मे रोजी बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली, ७ मे रोजी बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली, ८ व ९ मे रोजी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

वादळी वारा व पावसाचा अंदाज घेऊनच नागरिकांनी, शेतकऱ्यांनी घराबाहेर पडावे. शेतात मजुरांनी झाडाच्या आडोशाला उभे राहू नये, वादळामुळे पत्रे उडण्याची शक्यता असते. त्यामुळे जनावरांना पत्राच्या खोलीत बांधू नये. जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहनही ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.

Web Title: Chance of rain in Marathwada in next four days