बनावट सातबाराद्वारे गहाणखत करून कर्ज उचलले; २२ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 06:44 PM2021-08-05T18:44:17+5:302021-08-05T18:45:12+5:30

फायनान्स कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीवरून पूर्व अधिकारी आणि इतरांवर गुन्हा दाखल

Borrowed by mortgaging through fake satbara; Crime of fraud against 22 persons | बनावट सातबाराद्वारे गहाणखत करून कर्ज उचलले; २२ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

बनावट सातबाराद्वारे गहाणखत करून कर्ज उचलले; २२ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

googlenewsNext

वसमत ( हिंगोली ) : बनावट सातबारा उतारे व नमुना नंबर आठ बनावट तयार करून त्याचे दुय्यम निबंधक कार्यालयात हाउसिंग फायनान्स कंपनीच्या नावे गहाणखत करून कर्ज उचलण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह २२ जणांविरोधात संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये २२ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

महिंद्रा रूलर हाऊसिंग फायनान्स शाखा वसमतचे विधी अधिकारी मोहम्मद मोईज पाशा यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यामध्ये कर्ज उचलण्यासाठी बनावट उतारे तयार करून त्याचे दुय्यम निबंधक कार्यालयात कंपनीच्या नावे गहाणखतही करण्यात आले. त्याआधारे २२ लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. १ जानेवारी २०१७ ते ४ ऑगस्ट २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. कंपनीचे अधिकारी व कर्मचारी व कर्जदार ग्राहक यांनी संगनमताने ही फसवणूक केली असल्याने, २२ जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

फायनान्स कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीवरून महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्सचे पूर्व व्यवसाय अधिकारी अविनाश कासेवार, तांत्रिक अधिकारी बी. एस. गायकवाड रा. वसमत, विधी अधिकारी प्रदीप लोंढे रा. लाख, यशवंत मुठाळ रा. रा कळमनुरी, विधी अधिकारी गजानन ननगारे, रा. कळमनुरी, पतधोरण अधिकारी हेमंत करूमभट्टे रा. नांदेड, गंगाप्रसाद भोकरे, प्रकाश कदम, भगवान हिवाळे, कोंडबा अंभोरे, एकनाथ डोहरे, नवनाथ डोहरे, भीमराव हिवाळे, देवराव हिवाळे, गोविंद हिवाळे, रामदास जामगे, दत्ता शिंदे, गजानन अंभोरे, बालाजी हिवाळे, नारायण अंभोरे, चांदोजी हिवाळे, सर्व रा. पुयनी बु. ता. वसमत यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एस. बर्गे करत आहेत.

Web Title: Borrowed by mortgaging through fake satbara; Crime of fraud against 22 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.