सावधान! अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे तर खरेदी करीत नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST2021-05-06T04:31:43+5:302021-05-06T04:31:43+5:30

अशा प्रकारच्या बियाणांचा प्रचार बोगस कंपन्यांकडून खासगी एजंटांमार्फत केला जातो. निरनिराळी आमिषे दाखविली जातात. त्याला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, ...

Be careful! Don't buy unauthorized HTBT cotton seeds? | सावधान! अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे तर खरेदी करीत नाहीत?

सावधान! अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे तर खरेदी करीत नाहीत?

अशा प्रकारच्या बियाणांचा प्रचार बोगस कंपन्यांकडून खासगी एजंटांमार्फत केला जातो. निरनिराळी आमिषे दाखविली जातात. त्याला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. हे एचटीबीटी बियाणे लागवडीनंतर ग्लायफॉसेट हे तणनाशक फवारण्याची बनावट कंपनी व विक्रेते शिफारस करतील. मात्र, या तणनाशकामुळे कॅन्सरचा धोका असून अतिवापराने जमिनीची सुपिकताही नष्ट होते. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे.

यामुळे अधिकृत व परवानाधारक बीटी बियाणांचाच वापर करण्याचे आवाहनही कृषी विभागाने केले. फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. भेसळयुक्त व बनावट बियाणे खरेदीतून होणारी फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत पावती घेऊनच बियाणे खरेदी करावी. तसेच कोणी बोगस कंपनीचा एजंट प्रलोभने दाखवत असल्यास तालुका अथवा जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी केली.

बीटी वाणांच्या बियाणांची मुबलक मागणी

हिंगोली जिल्ह्यात कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र ३२ हजार हेक्टर आहे. हेक्टरी जवळपास अडीच पाकिटे लागतात. त्यामुळे विविध अधिकृत बीटी वाण विक्रेत्या कंपन्यांच्या बियाणांची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना बियाणे मुबलक प्रमाणात मिळेल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी दिली.

Web Title: Be careful! Don't buy unauthorized HTBT cotton seeds?