कोरोना संसर्ग महामारीची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:11+5:302021-04-01T04:30:11+5:30

हिंगोली : मार्च २०२०च्या २३ तारखेला कोरोनाने पाय रोवले अन् कोरोना विषाणू पुढे आला. दिनांक १ एप्रिल रोजी कोरोनाचा ...

Anniversary of the Corona Outbreak | कोरोना संसर्ग महामारीची वर्षपूर्ती

कोरोना संसर्ग महामारीची वर्षपूर्ती

हिंगोली : मार्च २०२०च्या २३ तारखेला कोरोनाने पाय रोवले अन् कोरोना विषाणू पुढे आला. दिनांक १ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. मग काय सर्वत्र चिंतेचे सावट पसरले.

कोरोना विषाणू आला आणि तो थैमान घालणार, या भीतीने सर्वच यंत्रणाही खबरदारी घ्यायला लागली. पण तोपर्यंत उशीर झालेला होता. कोरोनाचा पहिला रूग्ण जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आहे, या रुग्णाची माहिती हा हा म्हणता सर्वांना समजली. रोज ज्या माणसाशी रस्त्यात उभे राहून बोलायचे, त्यांनी त्या रुग्णाशी बोलणेही सोडून दिले. एवढेच काय त्याच्याकडे पाठ करणे सुरू केले. त्याच्याशी शेजारीही बोलेनासे झाले. आपण असा काय गुन्हा केला, हे त्यालाही कळेना झाले होते. असेच बघता-बघता दिवसामागून दिवस निघून जात होते. नंतर मात्र रूग्णसंख्या वाढली. तोपर्यंत तो पहिला रूग्ण निगेटिव्ह आला आणि जे पाहून नाक मुरडायचे ते त्याला नमस्कार करायला लागले. जानेवारी २०२१पासून तर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यात दोन वेळेस टाळेबंदी करुन नागरिकांना मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा, अशा सूचना दिल्या आहेत.

Web Title: Anniversary of the Corona Outbreak