शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेच्या ३६ डॉक्टरांची जबाबदारी केवळ १७ डॉक्टरांवर; वैद्यकीय तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 19:52 IST

हिंगोली जिल्ह्यात  १०८ क्रमांकच्या १२ रूग्णवाहिका सेवेत आहेत.

ठळक मुद्देडॉक्टरांची पदभरणा करून घेणे ही कंपनीची जबाबदारी आहे.

- दयाशिल इंगोले 

हिंगोली : गंभीर रूग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी हिंगोली जिल्ह्यात  १०८ क्रमांकच्या १२ रूग्णवाहिका सेवेत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून रूग्णवाहिकेचा कारभार ढेपाळला आहे. ३६ डॉक्टरांची या रूग्णवाहिकेत आवश्यकता असतानाही केवळ १७ डॉक्टरांवरच कारभार सुरू आहे. रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सेवेबाबत तक्रारीही वाढल्या आहेत.

गंभीर रूग्णांसाठी जीवनदायिनी असलेल्या १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेत सध्या डॉक्टरांचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सेवेबाबत तक्रारी वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे रूग्णवाहिका सेवीची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीला याबाबत वारंवार पत्र पाठवून डॉक्टरांची पदभरणा करावी या संदर्भाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पत्र पाठविले आहे. परंतु सदर पत्राला कंपनीकडून अद्याप उत्तर मिळाले नाही. परंतु कंपनीकडून पदभरती संदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयातर्फे देण्यात आली. असे असले तरी मागील काही दिवसांपासून रूग्णवाहिकेतील सेवेचा बोजवारा उडल्याने मात्र गंभीर रूग्णांचे हाल होत आहेत.

हिंगोली येथील जिल्हा रूग्णालय अंतर्गत जिल्ह्यात एकूण १०८ क्रमांकच्या अत्याधुनिक सेवा असलेल्या १२ रूग्णवाहिका आहेत. या बाराही रूग्णवाहिकेत नियमानुसार ३६ डॉक्टर असणे आवश्यक आहे. जेणेकरून आठ तासांच्या शिप्टनुसार रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सेवा देताना अडचणी येणार नाहीत. परंतु १७ डॉक्टरच सध्या कार्यरत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताणही येत आहे. त्यामुळे सध्या १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेचे नियोजनच कोलमडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सेवेमुळे गंभीर रूग्णांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

आपात्कालीन वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेमुळे अनेकांचे प्राणही वाचले. परंतु सध्या व्यवस्थापनच कोलमडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यात जिल्हा शल्यचिकित्सकही मागील काही दिवसांपासून ते आजारी रजेवर होते, परंतु ते रूजू झाले आहेत. त्यामुळे आता तरी रूग्णालयातील ढेपाळलेल्या कारभारावर नियंत्रण येईल का हाही प्रश्नच आहे. परंतु सध्या १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे मात्र गंभीर रूग्णांचा जीव धोक्यात सापडला आहे. अपघात किंवा इतरत्र कुठल्याही घटनेत गंभीर जमखी झालेल्या रूग्णांनाच्या मदतीला धावून जाणाऱ्या रूग्ण्वाहिकेतील सेवाच कोलमडली आहे.

१०८ रूग्णवाहिकेची जिल्ह्यात २०१४ पासून सेवाहिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात १०८ क्रमांकची सेवा २०१४ पासून कार्यान्वीत आहे. मागील पाच वर्षांत जवळपास ६३ हजार ६५८ रूग्णांना १०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेची सेवा मिळाली आहे. त्यामुळे हजारो रूग्णांना वेळेत उपचार मिळाल्याने जीवदानही मिळाले आहे. ४परंतु मागील काही महिन्यांपासून १०८ रूग्णवाहिकेतील वैद्यकीय सुविधेचे  नियोजन कोलमडले आहे. शिवाय याबाबत नागरिक, रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारीही वाढतच चालल्या आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असून तशी मागणी होत आहे.४जिल्हा रूग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील गोर-गरिब रूग्ण येथे उपचारासाठी येतात. परंतु जिल्हा रूग्णालयातील ढेपाळलेल्या कारभाराचा फटका त्यांना सहन करावा लागतो. याकडे मात्र संबंधित वैद्यकीय अधिकारी मात्र लक्ष देत नाहीत हे विशेष.

१०८ क्रमांकच्या रूग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या तुटड्या संदर्भात संबंधित कंपनीला तसे पत्र पाठविले आहे. डॉक्टरांची पदभरणा करून घेणे ही कंपनीची जबाबदारी आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असून जिल्हा रूग्णालयाकडून वारंवार पत्रही पाठविण्यात आले आहेत.- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास हिंगोली. 

टॅग्स :doctorडॉक्टरHingoliहिंगोलीmedicineऔषधं