शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यासोबतच जिल्ह्याचाही क्राइम रेट घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:30 IST

राज्यासह देशात वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. पैशांची चणचण भासत असल्याने कौटुंबिक कलह निर्माण ...

राज्यासह देशात वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. पैशांची चणचण भासत असल्याने कौटुंबिक कलह निर्माण होत आहेत. यातूनच महिला अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मात्र, पोलिसांच्या वतीने वेळीच मार्गदर्शन केले जात असल्याने कौटुंबिक कलह रोखण्यास मदत झाली आहे. येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात भरोसा सेल स्थापन करून येथे महिलांना मार्गदर्शन केले जात आहे. जोडप्यांमध्ये झालेले वाद मिटविण्यात भरोसा सेल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामुळेच कोरोनासारख्या काळातही महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. महिला अत्याचार प्रकरणी सर्व हेडखाली २०१९ मध्ये २६२ गुन्हे दाखल झाले. त्यानंतर २०२० मध्ये यात घट होत १९५ गुन्ह्यांची नोंद झाली. तर २०२१ मधील मार्च महिन्यात आजपर्यंत १४ गुन्ह्याची नोंद झाली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यात पोलिसांना यश आले तसेच गुन्हे सिद्ध होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासह अत्याचार झालेल्या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला आहे.

गृहमंत्री म्हणतात, राज्याचा क्राइम रेट घटला

१३ टक्क्यांनी वाढला गुन्हे सिद्ध होण्याचा दर

३२०० ने घट झाली पोक्सोअंतर्गंत गुन्ह्यात

९५९ ने घट महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात

११ टक्क्यांनी घट बलात्काराच्या गुन्ह्यात

जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे विनयभंगाचे

हिंगोली जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश आले असले तरी सर्वाधिक गुन्हे हे महिला विनयभंगाचे आहेत. २०१९ मध्ये जिल्ह्यात विनयभंगाचे ८९ गुन्हे दाखल झाले होते. त्यात २०२० मध्ये एकने घट होत ८८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर २०२१ मध्ये मार्च महिन्यात आजपर्यंत १३ गुन्हे दाखल झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

बलात्काराच्या गुन्ह्यांत महाराष्ट्र देशात २२ वा तर जिल्हा...

बलात्काराच्या घटनात महाराष्ट्राचा देशात २२ वा क्रमांक लागतो. जिल्ह्यात मात्र बलात्काराच्या घटनांत घट झाल्याचे पाहावयास मिळते. २०१९ मध्ये बलात्काराच्या ४६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये ३१ गुन्हे नोंदविले गेले. मार्च महिन्यात आजपर्यंत ३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात काय?

२०१९ २०२० २०२१

गुन्हे सिद्ध होण्याचा दर ३२% ३६%

पोक्सोअंतर्गंत गुन्हे ०० ०० ००

बलात्कार ४६ ३१ ०३

विनयभंग ८९ ८८ १३