शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही लसीकरणाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला गती आली आहे. लॉकडाऊन काळात यावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला गती आली आहे. लॉकडाऊन काळात यावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र लॉकडाऊनमध्येही ज्येष्ठांसह ४५ वर्षांवरील नागरिक लस घेण्यासाठी पुढे आल्याचे पाहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण सुरू आहे. यासाठी प्रशासन जनजागृती करीत आहे. आरोग्य विभागाने ठिकठिकाणी लसीकरण केंद्रे उभारून नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. सुरुवातीच्या काळात लसीकरणाचा वेग मंदावला होता. त्यात जिल्ह्यात दोन वेळेस संचारबंदीचा आदेश लागू केला होता. सर्व व्यवहार ठप्प असल्याने लस घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, असा अंदाज बांधला जात होता. मात्र लॉकडाऊनला न घाबरता या काळातही ज्येष्ठांसह ४५ वर्षांवरील नागरिक लस घेण्यासाठी पुढे आल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनचा लसीकरणावर कोणताही परिणाम न होता उलट या काळात लसीकरणाला गती आल्याचे स्पष्ट झाले आहे.

लसीकरणाला जाताना पोलिसांनी अडवले तर?

कोरोना आजाराला हरविण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. सध्या तर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. संचारबंदीचे आदेश लागू केले असल्याने पोलीस ठिकठिकाणी लक्ष ठेवून आहेत. मात्र, लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना पोलीस अडवणार नाहीत. अडवले तरी लस घेणारच.

- नारायण शिंदे, लाभार्थी

मागील आठवड्यात लागू केलेल्या संचारबंदी काळात तेवढे कडक निर्बंध नव्हते. पोलिसांनीही कुठे अडवले नाही. आता पोलीस ठिकठिकाणी लक्ष ठेवून आहेत. लसीकरणासाठी जाताना पोलिसांनी अडवले तर त्यांना आधार कार्ड दाखवून लसीकरणासाठी जात असल्याचे सांगणार आहे. परंतु, लस घेणार आहे.

- बाबाराव सुरूशे, लाभार्थी

कोरोनाचा आजार वाढत आहे. त्या अनुषंगाने लस घेणे महत्त्वाचे आहे. लॉकडाऊन राहिले पोलीस जागोजागी तैनात असतात. त्यामुळे लसीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनाने पर्याय शोधून लसीकरण कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करावेत.

- शेख शब्बीर, लाभार्थी

आतापर्यंत जिल्ह्यात झालेले लसीकरण

२७ मार्च - ७९०

२८ मार्च - ००

२९ मार्च - ००

३० मार्च - ६१६

३१ मार्च - १,०९४

१ एप्रिल - ७७८

२ एप्रिल - ३१९

३ एप्रिल - ९९७

४ एप्रिल - ००

५ एप्रिल - १,५१९

६ एप्रिल - १,४४०

७ एप्रिल -

हेल्थकेअर वर्कर - ८,५५०

फ्रंटलाइन वर्कर - ५,४६२

ज्येष्ठ नागरिक - १९,२३८

४५ वर्षांपेक्षा जास्त - ६,८६०