शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत जिल्ह्यात ३२१ कोरोना रुग्ण; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST

मंगळवारी जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत ५११ पैकी तब्बल १२० जण बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये हिंगोली परिसरात ११५ पैकी ३७, ...

मंगळवारी जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत ५११ पैकी तब्बल १२० जण बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये हिंगोली परिसरात ११५ पैकी ३७, वसमत परिसरात १४९ पैकी ३१, कळमनुरी परिसरात १४१ पैकी ३५, औंढा परिसरात ७८ पैकी १३ तर सेनगाव परिसरात २८ पैकी ४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तपासणी केलेल्यांपैकी जवळपास २४ टक्के पॉझिटिव्ह आढळल्याने ही बाब चिंतेची बनली आहे. आरटीपीसीआर चाचणीतही बाधित आढळलेल्यांची संख्या मोठी आहे. यात हिंगोली परिसरात ६२, वसमत परिसरात २१, कळमनुरी परिसरात १३, सेनगाव परिसरात ५ तर औंढा परिसरात ५ जण बाधित आढळून आले आहेत. आरटीपीसीआर चाचणीत एकूण १०४ बाधित आढळून आले आहेत.

मंगळवारी बरे झाल्याने घरी सोडलेल्यांमध्ये ९१ जणांचा समावेश आहे. त्यात सामान्य रुग्णालयातून ३३, लिंबाळा येथून ८, वसमत येथून १८, औंढा येथून ७ तर कळमनुरीतून २५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. यापैकी १२ जणांना संदर्भित केलेले होते.

कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे दिसून येत असून यावेळी रुग्णवाढीचा दरही मोठा आहे. त्यातच रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही वाढत चालले असल्याने आणखी काही दिवसांनी ऑक्सिजनवर ठेवलेल्या रुग्णांचा आकडाच शतकाच्या पुढे जाण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी गंभीर होणे गरजेचे बनले आहे.

एक महिलेचा व एका पुरुषाचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये हिंगोली येथील रिसाला बाजार येथील ८० वर्षीय वृद्ध पुरुष व वसमत तालुक्यातील बोराळा येथील एका ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता एकूण मृत्यूचा आकडा ८४ वर पोहोचला आहे.

सक्रिय रुग्णसंख्या ७२१ वर

हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा जसा वाढत चालला आहे. तशी सक्रिय रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. सध्या ७२१ रुग्ण दाखल आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ६३९३ रुग्ण आढळून आले. यापैकी ५५८८ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले तर दाखल असलेल्या ७२१ पैकी ६० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. याशिवाय १० जण बायपॅपवर आहेत.