कोरोनाचे नवे ३ रुग्ण; ५ बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST2021-07-31T04:29:55+5:302021-07-31T04:29:55+5:30

जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोली २६ पैकी अकोला बायपास भागात एक तर कळमनुरीत १७ पैकी कृष्णापूर भागात एक रुग्ण आढळून ...

3 new corona patients; 5 good | कोरोनाचे नवे ३ रुग्ण; ५ बरे

कोरोनाचे नवे ३ रुग्ण; ५ बरे

जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोली २६ पैकी अकोला बायपास भागात एक तर कळमनुरीत १७ पैकी कृष्णापूर भागात एक रुग्ण आढळून आला. औंढ्यात ४६, वसमतला १०३, सेनगावात ३९ जणांच्या तपासणीत एकही बाधित नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोलीत ४०, औंढ्यात ४२, सेनगावात ११, कळमनुरीत ४० जणांची तपासणी केली असता, एकही बाधित नाही. वसमतला ५६ पैकी शहरातील एक जण बाधित आढळला. बरे झाल्याने नवीन कोविड हॉस्पिटल येथून ५ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ९९५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १५ हजार ५९० जण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सध्या १७ जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत कोरोनाने ३८८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या दाखल असलेल्यांपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनवर असून, एक जण बायपॅपवर आहे.

Web Title: 3 new corona patients; 5 good