१९४ वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:40 IST2021-02-27T04:40:56+5:302021-02-27T04:40:56+5:30

जिल्ह्यात चार जुगार अड्ड्यावर छापा हिंगोली: जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत चार जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून १३ हजार ७०० ...

194 Action taken against drivers | १९४ वाहन चालकांवर कारवाई

१९४ वाहन चालकांवर कारवाई

जिल्ह्यात चार जुगार अड्ड्यावर छापा

हिंगोली: जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत चार जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील कुरुंदा, सेनगाव, हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस तपास करीत आहेत.

किरकोळ कारणावरून मारहाण

हिंगोली: शेतातील हरभऱ्याचे पीक बैल खात असल्याचे विचारल्यावरून, एकास मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील सावा येथे २१ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये आरोपींनी काठीने मारून जखमी केले, तसेच साक्षीदारासही दुसऱ्या आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादी रेणुका पांडुरंग गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: 194 Action taken against drivers