शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिल्या 'खास' टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 5:49 PM

Women Care Tips in Marathi: जीवनशैलीत आणि आहाराच्या पद्धतीत बदल घडवून आणल्यास महिलांच्या शारीरिक समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

मासिक पाळीचे ४ ते ५ दिवस प्रत्येक महिलेला नको वाटतात.  कारण त्या दरम्यान होत असलेल्या वेदनांमुळे महिलांना खूप त्रास होतो.  सध्याची व्यस्त जीवनशैली, फास्टफूडचे जास्त सेवन जेवणाच्या वेळा  ठराविक नसणं, ताण येणं अशा अनेक कारणांमुळे महिलांना मासिक पाळीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. जीवनशैलीत आणि आहाराच्या पद्धतीत बदल घडवून आणल्यास महिलांच्या शारीरिक समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. याबाबत ऋजुता दिवेकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चला  तर मग जाणून घेऊया न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिलेल्या काही खास टिप्स.

मनुके, केळी, तूप खायलाच हवं

सकाळी उठल्यानंतर भिजवलेले मनुके खाण्याचा प्रयत्न करा. दुपारनंतर एक केळं नियमितपणे खावं. रोज चमचाभर तूप खाण्यामुळे पाळीदरम्यान उद्भवणारा त्रास कमी होतो. वजन वाढतं म्हणून अनेकदा तूप खाणं टाळलं जातं पण एक चमचा तुपाचा वापर आपल्यासाठी गुणकारी ठरतो. 

राजगिरा आहारात असावा

आहारात राजगिरा हा आणखी एक नियमित खाण्यात येईल असा पदार्थ आहे.  तुम्ही राजगिऱ्याची चिक्की किंवा लाडूही खाऊ शकता. राजगिरा खाल्ल्यास आपल्याला कॅल्शियमची कमतरता कधीच जाणवणार नाही याशिवाय बटाटा, सुरण, रताळे नियमितपणे खाल्ले तर पीरियड पेन (PCOD) किंवा पाळीच्या वेळचा त्रास निश्चित कमी होईल, असं आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आहे. 

सगळ्या प्रकारच्या पीठांचा समावेश

बाजरी, मका, ज्वारी  यांचाही आपल्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे. आजकाल मल्टिग्रेन आटा खाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे, पण सगळी धान्य एकत्र करुन खाण्यापेक्षा वेगवेगळी खाणं जास्त फायद्याचं ठरू शकतं. संध्याकाळी एक केळं खाल्यास अशा उपायांनी पाळीदरम्यान  वेदना कमी होण्यास मदत होते. तसंच पाळीमध्ये अनेक जणींना मूड स्विंग्जची समस्या जाणवते तीदेखील यामुळे कमी होते. आयएमएने कोरोना उपचारांबाबत पुरावे मागिल्यानंतर, अखेर आरोग्य मंत्रालयाकडून खुलासा

बटाटासुद्धा खायला हवा

विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी बटाट्याचा आहारात समावेश करू नये, असं सांगितलं जातं पण योग्य प्रमाणात बटाटा खाल्ल्यास त्याचा उपयोग अनेक आजारांना दूर ठेवतो. आठवड्यातून 3-4 वेळा या भाज्या आहारात असायला हव्यात.असं ऋजुता दिवेकर यांनी सांगितले. सावधान! पुरूषांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली कारणं अन् लक्षणं

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWomenमहिलाExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला