सावधान! पुरूषांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली कारणं अन् लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 04:59 PM2020-10-11T16:59:54+5:302020-10-12T12:24:13+5:30

Health Tips Marathi : अमेरिकन कॅन्सर सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार ब्रेस्ट कॅन्सरची सुरूवात छातीच्या कोणत्याही भागापासून होऊ शकते.

Health Tips in Marathi : Why is breast cancer rapidly increasing in men | सावधान! पुरूषांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली कारणं अन् लक्षणं

सावधान! पुरूषांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली कारणं अन् लक्षणं

googlenewsNext

(Image Credit- Daily express, Medical News today)

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका  महिलांना सर्वाधिक असतो. पण पुरूषांनाही या प्रकारच्या कँन्सरचा धोका उद्भवू शकतो. १००० पैकी एका पुरूषाला ब्रेस्ट कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता असते.  पुरूषांमध्येही ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशींचा विकास होऊन शरीरातील इतर पेशींना धोका पोहोचण्याची शक्यता असते. जेव्हा हा कॅन्सर होतो तेव्हा छातीच्या पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात. साधारणपणे ट्यूमरसारखा आकार तयार होतो. या गाठीला एक्स रे च्या माध्यमातून पाहता येऊ शकतं. मॅक्स सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयातील डॉ. मीनू वालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त महिलांना कॅन्सरचा सामना करावा लागतो. पण पुरूषांनाही अनेकदा या समस्येचा सामना करावा लागतो. 

अमेरिकन कॅन्सर सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार ब्रेस्ट कॅन्सरची सुरूवात छातीच्या कोणत्याही भागापासून होऊ शकते. हा कॅन्सर डक्ट्सपासून सुरू होऊन निप्पलपर्यंत पोहोचतो. काहीवेळा ग्रंथींमध्ये सुरू होतो त्यामुळे  गाठीसारखा भाग त्वचेवर तयार होतो.  म्हणून स्तन कॅन्सरची काही लक्षणं दिसून आल्यास डॉक्टरांची संवाद साधणं गरजेचं आहे. जेवढा उपचारासाठी उशीर होईल तेवढा त्रास वाढतो आणि तो हाताबाहेर जाण्याचा धोका असतो.

पुरूषांमधील ब्रेस्ट कॅन्सरची कारणं

डॉक्टर मीनू वालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुवांशिकतेमुळे, अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे, शारिरिक हालचाल कमी केल्यानं, हार्मोनल रिप्लेसमेंट थेरेपी यांमुळे  पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. 

लक्षणं

छातीचा आकार वाढणं

त्वचेच्या रंगात बदल होणं

अल्सर किंवा रक्तस्त्राव होणं

निप्पलमधून स्त्राव होणं

या आजारापासून बचाव  होण्यासाठी  स्‍क्रीनिंग टेस्‍ट करायला हवी.  ३५ वर्षानंतर प्रत्येक पुरूषानं आपली स्क्रिनिंग टेस्ट करायला हवी. पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता महिलांच्या तुलनेत उतार वयात वाढते. पुरुषांमध्ये ब्रेस्ट ट्युमर तपासणं अधिक सोपं असतं.`गिनेकोमास्टिआ`मुळं ब्रेस्ट ट्युमर वाढतो.  पुरुषांना `इस्ट्रोजेन पॉझिटिव्ह ट्युमर`जास्त होऊ शकतो. त्यामुळे अशा पेशंटवर टॅमोत्सिफेन उपचार करणं शक्य असतं. महिला आणि पुरुषांमध्ये `सर्व्हाइव्हल रेट` मात्र सारखाच असतो. चिंताजनक! कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांवर होतंय 'या' नवीन आजाराचं आक्रमण; तज्ज्ञांचा दावा

आपल्याला अशी गाठ आहे हे सांगण्यास पुरुषांना  कमीपणा वाटतो असं निरीक्षणही डॉक्टरांनी नोंदवलं आहे. सध्याची व्यस्त अनियमित, जीवनशैली, वाढतं प्रदुषण, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, ताण-तणाव किंवा अनुवांशिक कारणांमुळे कॅन्सरचा धोका जास्त असतो. त्यामुळे कुठलीही शक्यता वाटल्यास किंवा शंका आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या असंही तज्ज्ञांनी सांगितले आहे. आयएमएने कोरोना उपचारांबाबत पुरावे मागिल्यानंतर, अखेर आरोग्य मंत्रालयाकडून खुलासा

Web Title: Health Tips in Marathi : Why is breast cancer rapidly increasing in men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.