चिंताजनक! कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांवर होतंय 'या' नवीन आजाराचं आक्रमण; तज्ज्ञांचा दावा

By manali.bagul | Published: October 11, 2020 09:43 AM2020-10-11T09:43:03+5:302020-10-11T09:57:47+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना संक्रमणामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम झाल्यानंतर त्याची कार्यप्रणाली सामान्य होते. पण डायबिटीस, बीपी, लठ्ठपणा, सीओपीडी आणि दमा यासारखे इतर आजार असलेल्या रुग्णांना पल्मोनरी फायब्रोसिसची शक्यता जास्त असते.

Corona virus patients may suffer from pulmonary fibrosis after covid-19 doctors warns | चिंताजनक! कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांवर होतंय 'या' नवीन आजाराचं आक्रमण; तज्ज्ञांचा दावा

चिंताजनक! कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांवर होतंय 'या' नवीन आजाराचं आक्रमण; तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना व्हायरसची लस लवकरत लवकर येईल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला औषधं आणि एंटीबायोटिक्स दिले गेले नाही तर पुढे जाऊन पल्मोनरी फायब्रोसिससारखा जीवघेणा आजार उद्भवण्याची शक्यता असते. एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरस फुफ्फुसांना वेगाने खराब करतो. त्यामुळे कोरोनानंतर पुढे फायब्रोसिसचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. पल्मोनरी फायब्रोसिस हा एक गंभीर आजार असून यामुळे फुफ्फुसांच्या पेशी खराब व्हायला सुरूवात होते. 

कोरोना संक्रमणामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम झाल्यानंतर त्याची कार्यप्रणाली सामान्य होते. पण डायबिटीस, बीपी, लठ्ठपणा, सीओपीडी आणि दमा यासारखे इतर आजार असलेल्या रुग्णांना पल्मोनरी फायब्रोसिसची शक्यता जास्त असते. एका हिंदी वृत्तवेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे आरोग्यमंत्री प्रभुराम चौधरी यांना फुफ्फुसांच्या समस्येमुळे एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोरोना इन्फेक्शनमधून रिकव्हर झाल्यानंतर त्यांना फायब्रोसिसची समस्या उद्भवली होती.

इम्यून कैसे करता है बचाव?

तज्ज्ञ काय सांगतात

डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोरोनाच्या उपचारांसाठी डॉक्टरांना रुग्णांच्या फुफ्फुसांवर अधिक लक्ष द्यावे लागते. म्हणूनच कोरोनातून बरं झाल्यानंतर रुग्णाने आपले रेग्युलर चेकअप करण्यासाठी डॉक्टरांच्या संपर्कात राहायला हवं. जेणेकरून फुफ्फुसं चांगल्या अवस्थेत राहतील. याव्यतिरिक्त डॉक्टरांनी दिलेले एंटीबायोटिक्स, स्टेरॉईड या औषधांचे नियमित सेवन करायला हवे.  कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर ज्या लोकांना सतत खोकला येत असेल, चालताना दम लागत असेल, त्यांच्यात पल्मोनरी फायब्रोसिसची समस्या असू शकते. 

पल्मोनरी फायब्रोसिस पर्मानेंट पल्मोनरी आर्किटेक्चर डिस्टॉर्शन  म्हणजेच लंग्स डिसफंक्शनशी  निगडीत असलेली समस्या आहे. कोरोनाच्या संक्रमणानंतर फुफ्फुसांवर तीव्र परिणाम  होण्याची शक्यता असते.  हा आजार उद्भवुल्यास रुग्णाला श्वास घ्यायला  त्रास होतो. हळूहळू रुग्णांच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासायला सुरूवात होते. अनेकदा या लक्षणांची कारणं कळून येत नाहीत.या कंडीशनला डॉक्टरर्स इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस असं म्हणतात.

कोरोना व्हायरसची लागण होण्यापासून बचाव हाच या आजारापासून बचावाचा मार्ग आहे, कारण अद्याप या विषाणूचा उपचार करण्यासाठी कोणतेही प्रभावी औषध नाही. म्हणूनच सौम्य लक्षणं दिसत असताना आजार वाढण्याआधीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्यावेत. 

आयुर्वेदाने कोरोनाचे उपचार करण्यावर  इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारकडून मागितला पुरावा

आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना आयुष आणि योगा यांवर आधारीत कोरोनाविषयी  प्रोटोकॉल्सच्या पुराव्यांबाबत विचारणा केली होती. आयएमएने कोरोनाच्या लक्षण नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना आयुष आणि योगाच्या साहाय्याने बरं होता येऊ शकतं. या मुद्द्यावरून डॉ. हर्षवर्धन यांना वेगवेगळे प्रश्न विचारले होते.

आयएमएने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार योगा आणि आयुर्वेदाने कोरोनावर उपचार होऊ शकतात.  या अभ्यासाबाबत  सामाधानकारक पुरावे  आहेत का? असा प्रश्न उपस्थित  केला होता. हे पुरावे मजबूत आहेत की कमकुवत याबाबतही विचारणा केली होती. कोरोनाचं गंभीर स्वरुप हाइपर इम्यून स्टेटस आहे की इम्यून डेफिशियेंसी स्टेटस?,  याबाबत वैज्ञानिकांचे दाखले आहेत का अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. CoronaVirus News : फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण कोरोनाग्रस्तांसाठी ठरू शकतं घातक, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

याशिवाय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाच्या उपचारांसाठी कोणती चाचणी केली जात आहे? सरकारमधील किती मंत्र्यांनी या प्रोटोकॉल्सच्या आधारे आपले उपचार केले आहेत? जर या प्रोटोकॉल्समध्ये तथ्य असेल तर  कोविड केअर आयुष मंत्रालयाकडे सोपवण्यास कोणी रोखले आहे? या प्रश्नांबाबत आरोग्यमंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागण्यात आले होते. खुशखबर! कॅन्सरच्या उपचारांसाठी भारतीय वैज्ञानिकांनी तयार केलं अनोखं 'बँडेज', तज्ज्ञांचा दावा

Web Title: Corona virus patients may suffer from pulmonary fibrosis after covid-19 doctors warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.