वर्कआउट करूनही वजन कमी होत नाहीय? तुम्ही सुद्धा ही चूक करताय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 09:47 AM2019-07-05T09:47:34+5:302019-07-05T09:54:47+5:30

वाढलेल्या कामाच्या वेळा, कामाचा वाढता ताण, धावपळ, खाण्या-पिण्याच्या लागलेल्या चुकीच्या सवयी यामुळे फिट राहणं अनेकांसाठी आव्हानात्मक झालं आहे.

Why we don't loose much weight even after workout? Know the reason | वर्कआउट करूनही वजन कमी होत नाहीय? तुम्ही सुद्धा ही चूक करताय का?

वर्कआउट करूनही वजन कमी होत नाहीय? तुम्ही सुद्धा ही चूक करताय का?

Next

(Image Credit : Healthline)

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमध्ये नियमित फिट पाहणं ही मोठी गरज आहे. पण वाढलेल्या कामाच्या वेळा, कामाचा वाढता ताण, धावपळ, खाण्या-पिण्याच्या लागलेल्या चुकीच्या सवयी यामुळे फिट राहणं अनेकांसाठी आव्हानात्मक झालं आहे. अशात अनेकजण त्याच्या रुटीनमध्ये वर्कआउटचा समावेश करतात. काही लोक केवळ वजन कमी करण्यासाठी वर्कआउट सुरू करतात. पण असं पाहिलं गेलं आहे की, वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना एक्सरसाइजने फार फायदा होत नाही. याचं नेमकं कारण समोर आलं आहे.

(Image Credit : Cleveland Clinic Health Essentials)

वजन कमी करण्यासाठी आपण नव्या लाइफस्टाईलला सुरूवात करतो, त्यामुळे त्यात कळत-नकळत अनेक प्रकारचे बदल करतो. हे बदलच अनेकांसाठी वैरी ठरतात. अभ्यासकांचं म्हणणं आहे की, एक्सरसाइज करणारे लोक जास्त खाऊ लागतात किंवा वर्कआफटचं कारण देऊन इतर हालचाली कमी करतात. त्यामुळे त्यांना नुकसानाचा सामना करावा लागतो.

(Image Credit : Cleveland Clinic Health Essentials)

या रिसर्चमध्ये त्या लोकांचा समावेश केला होतो ज्या वर्कआउट करत नव्हते. रिसर्चदरम्यान त्यांच्या कंबरेत आलेल्या फरकाला ट्रॅक केलं गेलं. यातील काही लोकांना त्यांची नॉर्मल लाइफ नियमित करायला सांगण्यात आलं. तेच काही लोकांना वर्कआउट सुरू करण्यात आला. वर्कआउट करणाऱ्यांना देखील दोन गटांमध्ये विभागलं गेलं. या ग्रुपला एक्सरसाइजने आठवड्यातून साधारण ७०० कॅलरी बर्न करायच्या होत्या, तेच दुसऱ्या ग्रुपला १, ७६० कॅलरी बर्न करायच्या होत्या.

(Image Credit : Daily Star)

जे लोक एक्सरसाइज करत होते, त्यांच्यात काहीच फरक बघायला मिळाला नाही. तर वर्कआउट करणाऱ्या दोन्ही ग्रुपमध्ये अपेक्षेपेक्षा कमी वजन कमी झालं. रिसर्चदरम्यान एक्सरसाइज करणाऱ्या लोकांनी जास्त खाणं सुरू केलं होतं. त्यामुळे बर्न केलेल्या कॅलरीजचा फायदा झाला नाही. उलट वर्कआउटमुळे आपल्या सामान्य दिनचर्येमुळे त्यांनी चालणं-फिरणं कमी केलं होतं.

Web Title: Why we don't loose much weight even after workout? Know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.