काही लोक सतत चिडचिड का करत असतात? जाणून घ्या कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 02:52 PM2021-06-24T14:52:20+5:302021-06-24T14:53:13+5:30

प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा असा स्वभाव असतो. आपल्यापैकी बरेचजण काही कारणामुळे चिडचिड करत असता. पण हे तेवढ्यापुरती मर्यादित असते. मात्र काही  माणसं सतत चिडचिडी असतात. त्या मागची कारणं जाणून घेऊयात...

Why are some people constantly irritated? Find out why | काही लोक सतत चिडचिड का करत असतात? जाणून घ्या कारणं

काही लोक सतत चिडचिड का करत असतात? जाणून घ्या कारणं

Next

प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा असा स्वभाव असतो. आपल्यापैकी बरेचजण काही कारणामुळे चिडचिड करत असता. पण हे तेवढ्यापुरती मर्यादित असते. मात्र काही  माणसं सतत चिडचिडी असतात. चिडचिड करण्यासाठी त्यांना काही कारण पुरते. असा चिडचिडा स्वभाव असला तर त्यांच्यामुळे घरातील वातावरणही खराब होते. डॉ. तिमोथी लेग यांनी मेडिकल न्युज टुडेला दिलेल्या माहितीनूसार अशी काही कारण आहेत, ज्यामुळे ती व्यक्ती सतत चिडचिड करते.

अर्थरायटीस किंवा अन्य क्रॉनिक पेन
जर एखाद्या व्यक्तीला काही गंभीर दुखणे असेल तर त्यामुळे त्या व्यक्तीची चिडचिड होणे स्वाभाविक असते. अशी माणसं त्यांच्या दुखण्यामुळे सतत त्रस्त असतात. त्यामुळे ती सतत चिडचिड करत राहतात.

डिप्रेशन
डिप्रेशन ही अशी समस्या आहे ज्यात व्यक्ती सतत चिडचिडा असतो. सतत उदास असणे, एकटेपणाची भावना असणे यामुळे ही व्यक्ती सतत चिडचिड करते. लक्षात घ्या, चिडचिडेपणा हे डिप्रेशनचे प्रमुख लक्षण आहे.

डिमेंशिया
डिमेंशिया हा मानसिक आजार आहे. वय वाढल्यामुळे काही व्यक्तींना डिमेंशियाचा सामना करावा लागतो. यामध्ये व्यक्ती रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीही विसरतो. त्यामुळे त्याच्या रोजच्या कामांमध्ये अडथळा येतो. हेच कारण असते की त्यामुळे ती व्यक्ती चिडचिड करते.

सतत चिंता करणं
सतत चिंता केल्याने काही व्यक्ती सतत चिडचिडेपणा करतात. लहान मोठ्या गोष्टीवर कटकट करतात. सततच्या चिंतेमुळे त्या व्यक्तीच्या मेंदुतील काही रासायनिक प्रक्रिया असंतुलित होतात. त्यामुळे चिडचिड अधिक वाढते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Why are some people constantly irritated? Find out why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app