शाकाहारी लोक अशी बनवू शकतात मस्कुलर बॉडी, जाणून घ्या डाएट टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 09:55 AM2019-10-30T09:55:22+5:302019-10-30T10:05:56+5:30

प्रत्येक तरूणाची इच्छा असते की, त्यांची मस्कुलर बॉडी असावी. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तरूण लवकरच जिम जॉइन करतात.

Vegetarian can make muscles, Know the tips | शाकाहारी लोक अशी बनवू शकतात मस्कुलर बॉडी, जाणून घ्या डाएट टिप्स!

शाकाहारी लोक अशी बनवू शकतात मस्कुलर बॉडी, जाणून घ्या डाएट टिप्स!

googlenewsNext

(Image Credit : spotfikri.blogspot.com)

प्रत्येक तरूणाची इच्छा असते की, त्यांची मस्कुलर बॉडी असावी. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तरूण लवकरच जिम जॉइन करतात. पण यासोबतच एक्सरसाइज आणि डाएटवर योग्य फोकस करूनही तुम्ही मस्कुलर बॉडी मिळवू शकता. फिट बॉडी बनवण्यासाठी काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या नियमितपणे फॉलो कराल तरच तुम्हाला मस्कुलर बॉडी मिळवण्यास मदत होईल.

नाश्त्याआधी घ्या वेकअप मील

(Image Credit : diabeticmuscleandfitness.com)

मस्कुलर बॉडी मिळवण्यासाठी सकाळी उठल्यावर केवळ नाश्त्यावरच मर्यादित राहू नका. वॉक आणि एक्सरसाइजआधी वेकअप मीलही घेऊ शकता. कारण रात्री ७ ते ८ तासाच्या झोपेदरम्यान शरीराची एनर्जी भरपूर बर्न झालेली असते. अशात शरीरातील टिश्यूजना एनर्जीची गरज असते. वेकअप मीलमध्ये तुम्ही प्रोटीन आणि फळांचं सेवन करू शकता. या गोष्टीची काळजी घ्या की, अनोशा पोटी सफरचंद आणि दही खाऊ नये. 

ब्रेकफास्ट कसा असावा?

(Image Credit : timeslive.co.za)

मस्कुलर बॉडी हवी असेल तर तरूणांनी नाश्त्यामध्ये प्रोटीन आणि ग्लूकोजयुक्त पदार्थ खावेत. सोबतच याचीही काळजी घ्यावी की, नाश्ता कधीच टाळू नका. तुम्ही नाश्त्यामध्ये पनीर, दूध, पनीर पराठा, कडधान्य, दही, ओटमील आणि डाळींचं सेवन करू शकता. 

मिड मॉर्निंग मील

(Image Credit : home-base.co.za)

एका फिट व्यक्तीला दिवसभरात २ हजार कॅलरींची गरज असते. या कॅलरीज सामान्यपणे सगळेच लोक दिवसभरातील तीन वेळच्या जेवणातून घेत असतात. पण जर तुम्हाला मसल्स बनवायचे असतील तर तुम्हाला जेवण ५ ते ६ भागांमध्ये विभागावं लागेल. याने शरीराला कॅलरीज मेटाबॉलाइज्ड करण्यास मदत मिळेल. मिड मॉर्निंग मीलमध्ये तुम्ही भाज्या, चणे, फळं आणि ड्रायफ्रूट्स खाऊ शकता.

लंच मॅनेजमेंट

(Image Credit : businessinsider.in)

मिड मॉर्निंग मीलनंतर तुम्ही लंचमध्ये बीन्स, एक कप ब्राउन राइस, चपाती, ब्रोकली किंवा कोबीची भाजी खाऊ शकता. याने तुमच्या शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण मिळेल.

सायंकाळचं वर्कआउट आणि मील

(Image Credit : cookinglsl.com)

सायंकाळी वर्कआउटआधी तुम्हाला काहीना काही आवर्जून खावं. याला प्री-वर्कआउट मील असंही म्हणतात. जर तुम्हाला हवं असेल तर एक्सरसाइज दरम्यान तुमच्या शरीरात एनर्जी लेव्हल कायम राहते आणि तुम्ही योग्यप्रकारे परफॉर्म करू शकाल. वर्कआउटच्या साधारण १ तास आधी हलकं काही खावं. यात तुम्ही टोस्ट, बॉइल मका आणि रताळी खाऊ शकता.

पोस्ट वर्कआउट मील

(Image Credit : breakingmuscle.com)

वर्कआउटच्या १५ ते २० मिनिटांनंतर तुम्ही शेक, छास किंवा ज्यूस सेवन करू शकता. याने तुम्हाला आवश्यक न्यूट्रिशन आणि प्रोटीन मिळतील.

तुमचा डिनर प्लॅन

(Image Credit : dreamdinners.com)

शरीरात इन्सुलिनचं प्रमाण कायम ठेवण्यासाठी रात्रीचं जेवण करणं फार गरजेचंअसतं. तुम्ही रात्रीच्या जेवणात भाज्या, बीन्स, पनीर यांसारखे पदार्थ खाऊ शकता.

(टिप : वरील लेखातील टिप्स या केवळ माहिती म्हणून देण्यात आल्या आहेत. या टिप्स फॉलो करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. अशात प्रत्येकाला याचा फायदा होईलच असं नाही.)


Web Title: Vegetarian can make muscles, Know the tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.