शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

'हे' पदार्थ मायक्रोवेवमध्ये गरम करत असाल तर जीवाला उद्भवू शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 10:03 AM

सध्याच्या काळात मायक्रोवेवमध्ये जेवण गरम करणं ही खूप साधारण गोष्ट झाली आहे.

सध्याच्या काळात मायक्रोवेवमध्ये जेवण गरम करणं ही खूप साधारण गोष्ट झाली आहे. अनेकजण गॅसऐवजी मायक्रोवेवचा वापर करत असतात. पण हीच गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. साधारणपणे जेव्हा आपण मायक्रोवेवमध्ये जेवण गरम करत असतो तेव्हा त्यावर बॅक्टरिया राहण्याची शक्यता असते. ज्यामुळे कॅन्सरसारखा जीवघेणा आजार होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला मायक्रोवेवचा वापर करायचा असेल तर त्यात कोणते पदार्थ गरम करायचे आणि कोणते पदार्थ गरम करायचे नाही हे माहीत असणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत.  जे पदार्थ मायक्रोवेवमध्ये गरम केल्यानंतर तुमच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो. 

अंड

जर तुम्ही उकळलेले अंड गरम करण्यासाठी मायक्रोवेवचा वापर करत असाल तर अंड फुटू शकतं.  वाफेमुळे  जास्त गरम होऊन ते खात असताना तुमचं तोंड सुद्धा  भाजू शकतं. त्यासाठी तुम्ही उकळलेल्या अंड्याचे स्लाईल करून मग गरम करा नंतर त्याचे सेवन करा. असं केल्यास कोणताही धोका उद्भवणार नाही. 

 भात 

फूड स्टँडर्ड एजंसीच्या अभ्यासानुसार मायक्रोवेवमध्ये जर तुम्ही भात गरम करत असाल तर फूड पॉईजन होण्याची शक्य़ता असते. भातात असणारे  बॅसिलस सीरियस नावाचा बॅक्टरिया अधिक प्रमाणात असतो.  पदार्थ गरम झाल्यामुळे त्यातील बॅक्टिरीया नष्ट होतात पण स्पोर्स निर्माण होत असतात. इंटरनैशनल जर्नल ऑफ फूड माइक्रोबायोलॉजी यात प्रकाशित झालेल्या शोधानुसार तापमान वाढल्यामुळे  त्यात निर्माण होणारे स्पोर्स आपली संख्या वाढवतात. त्यामुळे फूड पॉईजन होण्याचा धोका असतो. 

पालेभाज्या 

जर तुम्ही  पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्यावेळी उरल्या असतील आणि तुम्ही ते मायक्रोवेवमध्ये गरम केले तर त्यात असणारे नाइट्रेट्स नाइट्रोसॅमाइंसमध्ये बदलतात. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा  धोका अधिक असतो.  त्यामुळे शक्य होत असल्यास मायक्रोवेवचा वापर कमी करा. 

लाल- मिरची 

जेव्हा तुम्ही लाल मिरची मायक्रोवेवमध्ये गरम करत असाल. ठेचा करण्यासाठी किंवा फोडणी देण्यासाठी तर ते घातक ठरू शकतं. त्यातील  कैप्साइसिन  पदार्थाला चव देण्याचं काम करत असतात. त्याचा वास हवेत पसरल्यानंतर डोळ्यांमध्ये आणि गळ्यात जळजळ होण्याची शक्यता असते. तसंच ज्या लोकांना सर्दिचा त्रास होतो. त्या लोकांना शिंका येणं,  डोळे लाल होणे अशा समस्या उद्भवू शुकतात

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स