महाराष्ट्रात संबंधित कंपनीच्या लसींचा वापर बंद - आरोग्यमंत्र्यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 07:10 PM2018-09-29T19:10:16+5:302018-09-29T19:11:13+5:30

पोलिओ लसीत व्हायरस आढळल्याच्या वृत्ताने नागरिकांनी घाबरून जाऊ नये

The use of the company's vaccines in Maharashtra is closed - Health information | महाराष्ट्रात संबंधित कंपनीच्या लसींचा वापर बंद - आरोग्यमंत्र्यांची माहिती 

महाराष्ट्रात संबंधित कंपनीच्या लसींचा वापर बंद - आरोग्यमंत्र्यांची माहिती 

Next

मुंबई - गाझियाबादमधील कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीत टाईप टू व्हायरस आढळल्याच्या वृत्तामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार संबंधित कंपनीमार्फत तयार करण्यात आलेल्या लसींचा वापर 11 सप्टेंबर 2018 पासून राज्यात थांबविण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली.
यासंदर्भात सविस्तर माहिती देताना आरोग्य मंत्री  सावंत यांनी सांगितले की, पोलिओ निर्मूलनासाठी दोन प्रकारे लसीकरण केले जाते. एक इंजेक्शन द्वारे आणि दुसरे तोंडावाटे. शरीरामध्ये रोगप्रतिबंधक शक्ती तयार करण्यासाठी क्षीण व्हायरस या लसींमध्ये असतात. ते संबंधित आजाराविरुद्ध लढण्याची ताकद शरीरात निर्माण करतात,  असे स्पष्ट करत आरोग्यमंत्री म्हणाले की, केंद्र शासनातर्फे. 10 सप्टेंबर 2018 रोजी या कंपनीच्या व्हॅक्सिनचा वापर न करण्याबाबतच्या सूचना राज्य शासनाला प्राप्त झाल्या असून दि. 11 सप्टेंबरपासून त्याचा वापर राज्यात बंद झाला आहे. पोलिओ लसीकरणात 2016 पर्यंतच टाईप टू व्हॅक्सिनचा वापर करण्यात आलेला आहे. यासंदर्भात केंद्र शासनासोबत चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: The use of the company's vaccines in Maharashtra is closed - Health information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.