शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

वन मील अ डे डाएट आरोग्यासाठी चांगली आहे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 10:22 AM

ट्विटरचा संस्थापक आणि सीईओ जॅक डॉर्सी (४२) हा सध्या त्याच्या विचित्र सवयींमुळे सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला आहे.

ट्विटरचा संस्थापक आणि सीईओ जॅक डॉर्सी (४२) हा सध्या त्याच्या विचित्र सवयींमुळे सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला आहे. जॅक डॉर्सी हा सध्या दररोज २४ तासांपैकी २२ तास फास्टींग करत आहे. ब्रेकफास्ट आणि लंच न करता थेट रात्रीचं जेवण करतो. तसेच ८ किमोमीटर पायी चालून ऑफिसला जातो आणि दररोज सकाळी १५ मिनिटे बर्फाच्या थंड पाण्यात आंघोळ करतो. इतकेच नाही तर जॅक विकेंडला सुद्धा काही खात नाही आणि २ दिवस केवळ पाणी पिऊन काढतो. 

(Image Credit : Washington Post)

एका आठवड्यात केवळ ५ वेळा जेवण

जॅक डॉर्सी सांगतो की, अशाप्रकारची स्ट्रीक्ट डाएट आणि हेल्थ प्लॅन फॉलो करुन त्याला फोकस आणि शार्प राहण्यास मदत मिळते. जॅक सांगतो की, या स्पेशल रुटीनमुळे त्याचा मेंदू क्लीअर असतो की, त्याला बेडवर पडल्यावर लगेच १० मिनिटात गार झोप लागते. पण त्याच्या आठवड्यातून केवळ  ५ वेळा जेवण करण्यावरुन सोशल मीडियात डिबेट सुरु झाली आहे. काही लोक याला इटिंग डिसऑर्डर म्हणजेच आजार म्हणत आहेत. 

(Image Credit : NewsGram)

वन मील अ डे काय आहे?

जॅक डॉर्सी हा वन मील अ डे म्हणजेच दिवसातून एकदाच जेवण करण्याचा प्लॅन फॉलो करतो. हे निरंतर उपवासाचं एक्सट्रीम वर्जन आहे. वजन कमी करुन किंवा शरीर डीटॉक्स करुन मानसिक आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने अनेकजण अशा प्रकारची फास्टींग फॉलो करतात. ज्यात तुम्हाला दिवसातील एका ठराविक वेळीच जेवण करायचं असतं. पण हा प्लॅन तेव्हाच फायदेशीर ठरतो जेव्हा याला योग्यप्रकारे केलं जातं. 

शरीराला होतात वेगवेगळे नुकसान

दिवसभरात केवळ एकदाच जेवण करण्याच्या डाएटचे अनेक दुष्परिणामही आहेत. 

- फार जास्त भूक लागल्यासारखं वाटणे

- शरीर थरथरणे 

- फार जास्त कमजोरी वाटणे

- थकवा आणि चिडचिडपणा

- कामावर लक्ष केंद्रीत होण्यास अडचण येणे

याने वाढतो बॅड कोलेस्ट्रॉल

वरील समस्यांसोबतच एका रिसर्चमधून समोर आलं होतं की, इटरमिटेंट फास्टींग म्हणजेच दररोज केवळ एकदाच जेवण करण्याच्या डाएट प्लॅनमुळे भलेही वजन कमी होत असेल पण याने शरीरात एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण फार वाढतं. बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा थेट संबंध हा हृदयरोगांशी संबंधित आजारांशी आणि स्ट्रोकसोबत आहे. तसेच वन मील इ डे डाएट फॉलो केल्याने बाइंज इटिंग म्हणजेच इच्छा नसताना जास्त खाण्याची सवयही तुमच्यात विकसीत होऊ शकते. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सTwitterट्विटर