अशुद्ध रक्तामुळे उद्भवतात त्वचेच्या समस्या; अशा करा दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 07:34 PM2019-02-04T19:34:28+5:302019-02-04T19:36:35+5:30

रक्त आपल्या शरीरातील सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्यासोबतच शरीराचे तापमान कंट्रोल करण्यासाठीही मदत करतं. परंतु अनेकदा चुकीचा आणि अनहेल्दी आहार घेतल्याने आपल्या रक्तामध्ये काही अशी तत्वही पोहोचतात, जे शरीरासाठी अत्यंत नुकसानदायी असतात.

Toxins in blood is related with skin diseases ways to keep it away | अशुद्ध रक्तामुळे उद्भवतात त्वचेच्या समस्या; अशा करा दूर

अशुद्ध रक्तामुळे उद्भवतात त्वचेच्या समस्या; अशा करा दूर

googlenewsNext

रक्त आपल्या शरीरातील सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्यासोबतच शरीराचे तापमान कंट्रोल करण्यासाठीही मदत करतं. परंतु अनेकदा चुकीचा आणि अनहेल्दी आहार घेतल्याने आपल्या रक्तामध्ये काही अशी तत्वही पोहोचतात, जे शरीरासाठी अत्यंत नुकसानदायी असतात. त्यामुळे शरीराला फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी शरीरात जमा होणारे टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडणं आवश्यक असतं. आपल्या शरीरामध्ये हवा, पाणी आणि जेवणामार्फत प्रदूषण आणि इतर प्राकृतिक तत्वांमुळे टॉक्सिन्स जमा होतात, जे शरीरासाठी अत्यंत घातक असतात. 

टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी लिव्हर करतं मदत

लिव्हर आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. कारण याचं काम शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी घटक शरीरातून बाहेर टाकणं हे असतं. परंतु जेव्हा शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त टॉक्सिन्स जमा होतात. त्यावेशी लिव्हरवर प्रेशर येतं. त्यामुळे लिव्हरऐवजी स्किनमार्फत टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. यामुळे त्वचेच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. 

त्वचेवर पूरळ येणं

रक्तामध्ये असलेल्या घाणीमुळे त्वचेवर पूरळ, पिंपल्स येतात. तसेच त्वचेच्या इतर समस्यांचा सामनाही करावा लागतो. दरम्यान शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी ही शरीराची एक पद्धत आहे. 

त्वचेशी निगडीत समस्या : 

- चेहऱ्यासोबतच शरीरावर पिंपल्स येणं.

- त्वचेवर लाल चट्टे येणं.

- शरीरावरील नसा निळ्या दिसणं किंवा त्वचेवर निळसर चट्टे येणं.

-  त्वचेवर खाज येणं किंवा पांढरे चट्टे येणं.

खूप पाणी प्या 

जर तुम्ही शरीरामध्ये असलेली घाण बाहेर टाकण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, सर्वात चांगला पर्याय म्हणजे, खूप पाणी प्या. दररोज 3 ते 4 लीटर पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध राहण्यासाठी मदत होते. पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ आणि हानिकारक बॅक्टेरिया यूरीन आणि विष्ठेवाटे बाहेर टाकण्यास मदत होते. 

बडिशोप खा

बडिशोप रक्त स्वच्छ करण्यासाठी मदत करते. दररोज बडिशोप खाल्याने शरीरातील रक्त डिटॉक्सिफाइड होतं. तसेच सर्व घाण आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. 

ग्रीन टी

ग्रीन टी प्यायल्याने ब्लड शुद्ध करण्यासाठी मदत होते. हे मेटाबॉलिज्म ठिक करण्यासाठी मदत करतं आणि रक्तातील अशुद्ध घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. 

सलाड 

सलाडमध्ये मुबलक प्रमाणात अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट आणि एंजाइम्स असतात. शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी हे मदत करतात. त्याचबरोबर शरीराची पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि इतर आवश्यक पोषक तत्व शरीराला मिळण्यासाठीही मदत करतं. 

फायबरयुक्त आहार

रक्त शुद्ध करण्यासाठी फायबर आणि व्हिटॅमिन सीचा आहारात समावेश करणं आवश्यक असतं. फायबरसाठी हिरव्या पालेभाज्या, फळं, ड्रायफ्रुट्स आणि कडधान्यांचा आहारात समावेश करू शकता. व्हिटॅमिन सी साठी लिंबू, संत्री, आवळा आणि पपई खाऊ शकता. 

व्यायाम करा

नियमितपणे व्यायाम केल्याने शरीराला घाम येतो. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी मदत होते. 

Web Title: Toxins in blood is related with skin diseases ways to keep it away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.