दातदुखीमुळे अस्वस्थ होण्यापेक्षा आधीच 'या' उपायांनी दात, हिरड्या ठेवा निरोगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 10:09 AM2020-05-14T10:09:25+5:302020-05-14T10:14:49+5:30

जेव्हा एखादा व्यक्ती जास्त गोड पदार्थाचे सेवन करतो. तेव्हा पीएच व्हॅल्यू कमी होते. त्यामुळे दातांमध्ये बॅक्टेरिया वाढायला सुरूवात होते. 

Tips to preserve tooth enamel and protect from cavities myb | दातदुखीमुळे अस्वस्थ होण्यापेक्षा आधीच 'या' उपायांनी दात, हिरड्या ठेवा निरोगी

दातदुखीमुळे अस्वस्थ होण्यापेक्षा आधीच 'या' उपायांनी दात, हिरड्या ठेवा निरोगी

Next

दातांमध्ये किड लागणे किंवा हिरड्यांना सुज येण्याची समस्या लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा उद्भवते. सतत  गोड पदार्थ खाल्ल्यामुळे लहान मुलांना कॅविटीजची समस्या उद्भवते. दुखत असलेल्या किंवा किड लागलेल्या दातांकडे लक्ष दिलं नाही तर हजारो रुपये खर्च करून दातांची ट्रिटमेंट करावी लागते. पण जर तुम्ही आधीच आपल्या दातांची काळजी घेतली तर  होणारा त्रास कमी करता येऊ शकतो. 

दातांवर एक सुरक्षाकवच असतं. त्याला इनॅमल असं म्हणतात. हे कवच कॅल्शियम आणि फॉस्फोरसपासून तयार झालेली असते. जेव्हा एखादा व्यक्ती जास्त गोड पदार्थाचे सेवन करत असतो. तेव्हा पीएच व्हॅल्यू कमी होते. त्यामुळे दातांमध्ये बॅक्टेरिया वाढायला सुरूवात होते. 

गोड आणि स्टार्च असलेले पदार्थ खाल्ल्याने दातांवर जीवाणू आक्रमण करतात आणि त्यामुळे दात खराब होऊ लागतात. दात किडून त्यात कॅव्हिटिज तयार होतात. अशा परिस्थितीत दातांची योग्य प्रकारे सफाई केली नाही तर त्यांच्यावर थर जमा होतात. त्यात जीवाणू टॉक्सिन्स तयार करतात. त्यामुळे दातांचे अधिक नुकसान होते. 

कॅव्हिटीजपासून वाचण्यासाठी दातांची अशी घ्या काळजी

गोड पदार्थांचे सेवन कमी करा. कारण गोड खाल्ल्यामुले दातांमध्ये बॅक्टेरीया वाढत जातात. जे तोंडाला एसिडिक बनवतात. त्यामुळे दात डॅमेज होण्याची शक्यता असते. जर तुम्ही गोड पदार्थ खात असाल तर लगेच गरम पाण्याच्या गुळण्या करा. 

श्वासांना दुर्गंधी येत असेल तर अनेकांना ती पोट साफ होत नसल्याचे तक्रार आहे असे वाटते. परंतु, 95 टक्के लोकांमध्ये हिरडय़ा आणि दातांची योग्य सफाई न झाल्यामुळे आणि त्यात  किड झाल्याने दुर्गंधी निर्माण होते. त्यासाठी काहीही खाल्यानंतर आधी दात स्वच्छ करा. 

एल्कोहोल, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेटबंद फूड, सोडा, चहा आणि कॉफी यामुळे दात खराब होतात. त्यासाठी अशा एसिडिक पदार्थांचे सेवन केल्यानंतर दात स्वच्छ करा. 

दुर्गंधी  घालवण्यासाठी बडीशेप, लवंग, तुळशी किंवा पुदिन्याची पाने चावून खा. मिंट किंवा इतर सुवासिक पण शुगरफ्री च्युईंग गम चावल्याने दुर्गंधी कमी होते.  

रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर दात घासायला हवेत. सॉफ्ट ब्रशचा वापर दात घासण्याासाठी करावा. 

सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला जर तुमचे दात चांगले ठेवायचे असतील तर आठवड्यातून एकदा गरम पाण्यात पेरूची पान उकळून घ्या. नंतर हे पाणी थंड करून पाण्याच्या गुळण्या करा. यामुळे तुमचे दात दीर्घकाळपर्यंत मजबूत राहतील.

(घरी जाताना सोबत येऊ शकतो कोरोना, संसर्ग टाळण्यासाठी प्रवासादरम्यान 'अशी' घ्या काळजी)

(‘या’ एका सवयीमुळे कोरोना विषाणूंसह ९ गंभीर आजारांचा होत आहे प्रसार)

Web Title: Tips to preserve tooth enamel and protect from cavities myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.