‘या’ एका सवयीमुळे कोरोना विषाणूंसह ९ गंभीर आजारांचा होत आहे प्रसार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 05:42 PM2020-05-13T17:42:31+5:302020-05-13T17:57:23+5:30

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी स्थानिक पातळीपासूनच ही सवय नष्ट व्हायला हवी.

Spitting can also spread corona virus and these 9 serious diseases myb | ‘या’ एका सवयीमुळे कोरोना विषाणूंसह ९ गंभीर आजारांचा होत आहे प्रसार

‘या’ एका सवयीमुळे कोरोना विषाणूंसह ९ गंभीर आजारांचा होत आहे प्रसार

googlenewsNext

कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस जगभरात वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे आणि सोशल डिस्टेंसिंगच पालन केलं जातं आहे. सार्वजनिक स्थळांवर थुंकल्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा प्रसार होतो. आरोग्य मंत्रालयाकडून सार्वजनिक स्थळांवर न थुंकण्यासाठी वारंवार आवाहन केलं जातं आहे.  तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार थुंकल्यामुळे शेकडो आजारांचा सामना करावा लागतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने केवळ एकच आजार होत नाही, तर अनेक आजार हे थुंकण्यामुळेच होत असतात. 

थुंकल्यामुळे शेकडो आजार पसरतात. 

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे व्हायरल बॅक्टेरिअल इन्फेक्शचा सामन करावा लागू शकतो. कोरोना व्यतिरिक्त टीबी, निमोनिया, बॅक्टीरियल मेनिनजाइटिस, ताप, एड्स, कांजण्या, पोलियो, डेंग्यू  यांसारखे मोठे आजार थुंकीमुळे पसरतात. एखाद्या थुंकलेल्या जागेवरून आपल्या चपला  थेट फरशीवर येत असतात तेव्हा नकळतपणे तुम्ही तुमच्यासोबत इन्फेक्शनसुद्धा घरी आणता. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी स्थानिक पातळीपासूनच ही सवय नष्ट व्हायला हवी.

आजारी व्यक्तीच्या थुंकीतील आजार पसरवणारे जंतू मोकळे होतात. ही प्रक्रिया एका नाही तर अनेक व्यक्तींच्या बाबतीत होते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांवर, आधीच आजारी असलेल्यांवर याचा परिणाम लगेच होतो. व्हायरस थेट एखाद्या व्यक्तीच्या  शरीरात प्रवेश करत नाही तर आपल्या तोंडातून, हातांतून व्हायरसचा शरीरात प्रवेश होतो. त्यासाठी सार्वजनिक स्थळांवर थुंकू नका. सतत हात धुत राहा. तरच  तुम्ही आजारांपासून वाचू शकता.

Spit, now Stop ..! Citizens should observe hygiene | थुंकीचे पाट, आता बास..! नागरिकांनी स्वच्छतेबाबत पाळावी स्वयंशिस्त

कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी गर्दीची ठिकाणं टाळण्याचे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळण्याचे, आवाहन आता सगळ्याच पातळीवर करण्यात येत आहे. हा धोका टाळण्यासाठी थुंकताना कोणीही दिसले त्याला प्रतिबंध करायला हवा. फक्त कोरोनाच्या काळात नाही तर कायम स्वरुपी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची वाईट सवय नष्ट करायला हवी. 

(फुफ्फुसांच्या आजारांचं कारण ठरू शकतं चेस्ट इन्फेक्शन; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)

(आता अँटीजन टेस्टमुळे १५ मिनिटात कोरोनाची तपासणी होणार; कशी होते 'ही' टेस्ट जाणून घ्या)

Web Title: Spitting can also spread corona virus and these 9 serious diseases myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.