आता अँटीजन टेस्टमुळे १५ मिनिटात कोरोनाची तपासणी होणार; कशी होते 'ही' टेस्ट जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 10:04 AM2020-05-13T10:04:55+5:302020-05-13T10:11:28+5:30

मोठया प्रमाणात लोकांची कोरोना चाचणी करायची असल्यास ही टेस्ट फायदेशीर ठरू शकते.

America approved antigen test corona will be detected in 15 minutes mass testing will be easy myb | आता अँटीजन टेस्टमुळे १५ मिनिटात कोरोनाची तपासणी होणार; कशी होते 'ही' टेस्ट जाणून घ्या

आता अँटीजन टेस्टमुळे १५ मिनिटात कोरोनाची तपासणी होणार; कशी होते 'ही' टेस्ट जाणून घ्या

googlenewsNext

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस जगभरासह भारतात सुद्धा वाढत चालला आहे. कोरोनामुळे मृत होत असलेल्यांची संख्या वाढत असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत लस आणि औषधं शोधलं जाणं खूप महत्वाचं आहे. सर्वच देशातील शास्त्रज्ञ लस आणि औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर लोकांची कोरोना तपासणी व्हावी यासाठी अँटीजन टेस्टला मंजूरी देण्यात आली आहे.  ही टेस्ट फक्त स्वस्त नसून वैद्यकीयदृष्या मास स्क्रिनिंगसाठी  फायदेशीर ठरणार आहे. 

तज्ञांनी लाखो कामगारांनी पुन्हा काम सुरू करण्यासाठी तसंच शाळा, महाविद्यालयं पुन्हा सुरू करण्यासाठी ही टेस्ट करून घेणं अत्यावश्यक असल्याचे सांगितले आहे. एफडीएने या टेस्टला मंजूरी दिल्यानंतर संक्रमित  रुग्णांच्या उपचारांसाठी ही पध्दत फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले आहे. या टेस्टला सॅन डियागोच्या क्यूजेल कॉरपॉरेशनमध्ये तयार करण्यात आलं आहे.  या टेस्टसाठी विशेष उपकरणांचा वापर जातो. या टेस्टबद्दल अधिक माहिती तुम्हाला सांगणार आहोत.

नाकाद्वारे फक्त १५ मिनिटात व्हायरस प्रोटीन्सच्या अंशाची माहिती या टेस्टमुळे मिळू शकते. नाकाद्वारे मिळालेले व्हायरसचे अंश केमिकल्समध्ये मिसळले जातात. त्यानंतर ई- रिडिंग डिव्हाईसमध्ये घालून एंटीबॉडी युक्त टेस्टिंग किटद्वारे तपासणी केली जाते. संक्रमण झालेल्या व्यक्तीकडून व्हायरस प्रोटिन्सच्या कणांना या टेस्टद्वारे मिळवलं जातं.  त्याप्रमाणे ताप आल्यानंतर डॉक्टर तपासणी करतात. त्याचप्रमाणे ही टेस्ट करत असताना नाकात हे उपकरण टाकलं जातं. मोठया प्रमाणावर लोकांची कोरोना चाचणी करायची असल्यास ही टेस्ट फायदेशीर ठरू शकते. (कमी काम करून जास्त थकवा येतो? मग क्रोनिक फटीग सिंड्रोमचे असू शकता शिकार)

सैपल लेते स्वास्थ्यकर्मी (फाइल फोटो)

हार्वर्डमधील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या टेस्टची क्षमता तीन पट जास्त आहे. रोज ९ लाख लोकांची टेस्ट याद्वारे करता येऊ शकते. एफडीएने  ही टेस्ट ८० टक्के परिणामकारक ठरत असल्याचा दावा केला आहे. अँटीजन टेस्टमुळे  संक्रमणाची लक्षणं दिसत असलेल्या निगेटिव्ह रुग्णांचीसुद्धा चाचणी केली जाईल. ओराश्योर टेक्नॉलॉजीने अमेरिका सरकारशी ७० कोटींचा करार केला आहे. लाळेवर आधारीत परिक्षण करून केली जात असेलेली ही अँटीजन टेस्ट तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  कोणतंही खास उपकरण न वापरता सोप्या पद्धतीने २० ते ३० मिनिटात  ही टेस्ट होऊ शकते. 

(CoronaVirus News : गॅस पास केल्यामुळे कोरोना विषाणूंचं संक्रमण होतं? जाणून घ्या रिपोर्ट)

Web Title: America approved antigen test corona will be detected in 15 minutes mass testing will be easy myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.