शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

हे आहेत गाजराचे चमत्कारिक फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 15:47 IST

हिवाळ्यात रंगीबेरंग़ी भाजीपाल्याचे सेवन करण्याची मजा काही औरच असते. त्यातच थंडीत गाजर खाणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण गाजरामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज तर असतात.....

-Ravindra Moreहिवाळ्यात रंगीबेरंग़ी भाजीपाल्याचे सेवन करण्याची मजा काही औरच असते. त्यातच थंडीत गाजर खाणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण गाजरामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज तर असतात शिवाय मिनरल, व्हिटॅमिन्स आणि विटॅमिन ‘ए‘ हे देखील आहेत. यासाठी आपल्या त्वचेसाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर खूपच महत्त्वपूर्ण मानले जाते. गाजराचा वापर आपण सूप,  हलवा आणि सलादच्या माध्यमातूनदेखील करू शकता. गाजर फक्त स्वादातच नव्हे तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठीचे आवश्यक तत्त्व यात आहेत. शिवाय डोळ्यांचे आरोग्यदेखील चांगले राहते. काय आहेत गाजराचे फायदेडोळ्यांचे आरोग्यगाजरमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ भरपूर प्रमाणात असल्याने याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते. शिवाय यातील बीटा-केरोटिन आणि पोटॅशियमदेखील असल्याने शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्वचेची चकाकीरोजच गाजराचा सलाद खाल्ल्याने किंवा गाजराचा ज्यूस पिल्याने चेहऱ्यावर चकाकी येते. गाजराच्या सेवनाने रक्तातील विषाची मात्रा कमी होते. त्यामुळे मुरूमे-पुटकुळ्या आदींपासून सुटका मिळते. मधुमेहांपासून सुटकागाजराच्या नियमित सेवनाने त्यातील पोटॅशियम, मॅगनीज आणि मॅग्निशियममुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते. कॅन्सरपासून सुटकागाजरामध्ये कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्याचेही गुण आहे. यातील कॅरोटिनाईड नावाचे तत्त्व असते जे प्रोस्टेट, कोलोन आणि स्तन कॅन्सरशी लढण्यासाठी सक्षम आहे. गाजर खाल्ल्याने आतडीचा कॅन्सर कमी होण्याचे प्रमाण सुमारे २४ टक्क्यांपर्यंत कमी होते. हृदयरोगींसाठी फायदेशीरगाजरामधील कॅरोटिनॉईड तत्त्व हृदयरोगींसाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे गाजराच्या रोजच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.   अन्य फायदे* गाजरच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ‘के’ असते, ज्यामुळे रक्त गोठण्यास मदत होते आणि रक्तस्त्राव थांबतो. * गाजरमधील विटॅमिन ‘सी’ मुळे जखम ठीक होण्यास मदत होते शिवाय हिरड्यादेखील स्वस्थ राहतात. * गाजरमधील बीटा कॅरोटीनमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.